Reshan Card: फक्त धान्य नाही तर रेशन कार्डचे आहेत अनेक फायदे; वाचा सविस्तर

Reshan Card Benefits | रेशन कार्डच्या माध्यमातून गरजू आणि गरीब नागरिकांना शासनाकडून स्वस्त धान्य दिले जाते. आणि यामुळे गरिबांना मोठा फायदा होत आहे. कोरोना काळात सर्वकाही बंद होते. त्यावेळी शासनाने रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना मोफत धान्य वाटप केले होते. त्यामुळे नागरिकांची कोरोना काळात मोठी सोय झाली. आणि आत्ताही गोर गरीब नागरिक या रेशन कार्ड वरून धान्य घेऊन उदरनिर्वाह करत आहेत.

Join WhatsApp Group

 

आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून रेशन कार्डचे जे महत्त्वाचे फायदे आहेत. त्याबाबत माहिती सांगणार आहोत. रेशन कार्ड हे फक्त धान्य घेण्यासाठी उपयोगी येत नाही. तर त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक वेग वेगळ्या फायद्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो. रेशन कार्ड तुमच्या साठी किती महत्वाचे आहे. हे आज हा लेख वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल.

 

रेशन कार्डचे फायदे? (Reshan Card Benefits) –
रेशन कार्ड असण्याचे अनेक फायदे आहेत. धान्य घेण्या व्यतिरिक्त बँकेतील विविध कामांसाठी रेशन कार्डची आवश्यकता लागते. तसेच मतदान कार्ड काढण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक आहे. तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड चालते. गॅस सिलिंडर किंवा तुम्हाला जर वीज कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला रेशन कार्डची आवश्यकता पडू शकते.

 

या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला रेशन कार्ड लागते. तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये फी मध्ये सवलत पाहिजे असेल आणि तुमचे रेशन कार्ड हे दारिद्र्य रेषेखाली येत असेल तर तुम्हाला फी मध्ये देखील मोठी सवलत मिळू शकते. असे अनेक फायदे या रेशन कार्डच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या मार्फत पुरविले जातात.

 

उत्पन्नाच्या आधारावर दिले जाते रेशन कार्ड – जर तुमचे उत्पन्न वार्षिक 27 हजार रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो. आणि जर तुमचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एपीएल कार्ड साठी अर्ज करता येतो. त्यामुळे तुमचे जेवढे उत्पन्न कमी तेवढा जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. (Resham card online Application)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button