Reserve Bank Action: या बँकेत खाते असेल तर सावधान; रिझर्व्ह बँकेने केलीय मोठी कारवाई
RBI has taken major action against these banks.

Reserve Bank Fine | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने देशातील 13 बँकांना दंड ठोठावला आहे. आपल्या देशातील बँकेची सिस्टीम सुधारण्यासाठी मित्रांनो हे पाऊल बँकेने उचलले आहे. मिञांनो देशातील या सहकारी बँकेत तुमचे अकाऊंट आहे का? असेल तर तर या बँकांना रिझर्व्ह बँकेने दंड ठोकले आहेत. या बँकांनी नियमांचे उलंघन केल्यामुळे हे दंड करण्यात आले आहेत. (Reserve Bank Action on bank)
RBI ने या बँकेला दंड का ठोठावला – या बँकांनी नियमांचे उल्लंघन केलेले आहे. अशी माहिती प्राथमिक स्वरूपात मिळाली आहे. त्यामुळेच या बँकांवर कठोर कारवाई केली आहे. RBI ने माहिती सांगितली की या बँकांना 50000 ते 4 लाख रुपये दंड ठोठावला आहे. हा दंड चंद्रपूर मधील श्री कन्यका नागरी सहकारी बँक या बँकेला ठोठावला आहे. हा दंड RBI ने 4 लाख रुपये इतका ठोठावला आहे.
RBI ने कोणत्या बँकेला किती दंड ठोठावला आहे – बीड मधील वैद्यनाथ को ऑपरेटिव्ह बँकेला RBI ने २.५ लाख रुपये दंड केला आहे. तर साताऱ्यातील वाई अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेलाला ही दंड केला आहे. इंदूर प्रीमियर को ऑपरेटिव्ह बँकेला सुद्धा दंड केलेला आहे. तसेच पाटणा नागरी सहकारी बँक पाटणा आणि तुरा अर्बन बँक यांना प्रत्येकी १.५ लाख रुपयांचा दंड केला आहे.
या बँकांना सोडून भारतीय रिझरव्ह बँकेने जगदलपुर नागरिक सहकारी बँक, अमरावती मधील जिजाऊ सहकारी बँक, कोलकाता मधील ईस्टर्न बँक तर नॉर्थ इस्ट फ्रंटियर रेल्वे को ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, छत्रपुर येतील जिल्हा मध्वर्ती बँक, बिलासपूर मधील जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच शहडोल मधील यबँकेला ही मोठ्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने दंड केले आहेत. तर मित्रांनो आपण जर या बँकेमध्ये अकाउंट काढले असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल. (Reserve Bank Tack Action on Sahkari bank)