आत्ताच्या घडामोडी

रीमा लागू यांची मुलगी दिसतेय खुपचं सुंदर; करते हे काम

मुंबई | रीमा लागू यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट हिट ठरवले. बॉलीवूडमध्ये त्यांनी आई आणि सासू या भूमिका अधिक साकारल्या. त्यामुळे त्यांची प्रसिध्दी जास्त होती. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले. त्यातील ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट खूप जास्त गाजला.

 

रीमा यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये मध्यमवयीन आईची भूमिका साकारली होती. आक्रोश (1980) मध्ये त्या एक नृत्यांगना आणि ये दिल्लगी (1994) मध्ये एक कठोर व्यापारी होत्या. 1990 मध्ये, त्यांनी सुप्रिया पिळगावकर विरुद्ध तू तू मैं मैं या टीव्ही मालिकेत काम केले आणि श्रीमान श्रीमतीमध्ये देखील काम केले.

 

बिंदस्त या मराठी रहस्यपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. अशात रीमा यांच्या प्रमाणे त्यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्र गाजवत आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिने देखील अभिनयातच नाव कमवाच ठरवलं आहे.

 

रीमा यांची मुलगी मृण्मयी देखील दिसायला खूप सुंदर आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आई बरोबरचे अनेक जुने फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. अशात तिला यावर अनेक वेगवेगळ्या कमेंट येत असतात. नुकताच तिने स्वताचा एक सुंदर फोटो शेअर केला. यावर कमेंट आणि हार्ट इमोजीचा पाऊस पडला आहे. किती तो साधे पणा, खूप सुदंर, मुलगी असावी तर अशी आशा कमेंट तिला येत आहेत.

 

मृण्मयीने पिके, दंगल, ३ इडीयट्स, थप्पड अशा काही चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. आई प्रमाणे ती देखील अभिनय क्षेत्र गाजवणार असं अनेक चाहते म्हणतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button