Ration Card: 10 लाख रेशन कार्ड रद्द; सरकारचा मोठा निर्णय

10 lakh ration card canceled by Government

Ration Card | अनेक गरीब कुटुंब स्वस्थ धान्य दुकानातून धान्य घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. रेशन कार्ड द्वारे 80 कोटी लोकांना रेशन मिळते. आणि यातून त्यांचे घर चालत आहे. मात्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे यातील 10 लाख रेशन धारकांना मोठा तोटा होणार आहे. तसेच त्यांची रेशन कार्ड रद्द करण्याचे आदेश देखील शासनाने त्यांच्या स्तरावरून दिले आहे. (Ration Card Fraud)

Join WhatsApp Group

 

जो नागरिक आयकर भरतो आणि ज्याच्याकडे 10 एकर च्या पुढे शेती आहे. अशा नागरिकांना रेशन कार्डचां लाभ घेता येत नाही. ते BPL मध्ये मोडत नाहीत. मात्र देशात असे 10 लाखाहून अधिक नागरिक लाभ घेत आहेत. जे आयकर भारतात आणि त्यांना जामीन देखील जास्त आहे. अशा नागरिकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Ration Card Yojana 2022)

 

काही दिवसांपूर्वी काही केसेस आल्या होत्या, की काही नागरिक रेशन कार्ड द्वारे रेशन खरेदी करत आहेत. आणि खरेदी केलेले रेशन हे बाजारपेठेत विकत आहेत. यामुळे शासनाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यानंतर त्यांनी कठोर निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अशा 10 लाख नागरिकांना मोठा तोटा होणार आहे. त्यांचे रेशन कार्ड कायम स्वरुपी रद्द करण्यात येणार आहे.

 

शासनाने अशा नागरिकांची यादी तयार करून रेशन दुकानदारांना दिली आहे. तसेच अशा नागरिकांना रेशन देऊ नये असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच जर असे कोण करून शासनाची फसवणूक करत असेल तर त्याची माहिती वरिष्ठांना द्या, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाची मोठी फसवणूक उघड झाली आहे. आत्तापर्यंत घेतलेल्या स्वस्थ धान्य देखील त्यांच्या कडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button