रानू मंडलचा टॉवेल गुंडाळून भन्नाट डान्स; पाहून पोट धरून हसाल

पुणे | एका रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन रातोरात स्टार झालेली रानू मंडल तुम्हाला माहीतच असेल, लता मंगेशकर यांचं एक प्यार का नगमा हैं! हे गाणं तिने गायलं होत. एका सोशल मीडिया वापरकर्त्यांने तिचा व्हिडिओ काढला आणि तो फेसबुक वर शेअर केला.

 

त्यानंतर तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की काही सांगायचं नाही. एका रात्रीत रानू स्टार बनली. तिला बड्या दिग्गजांनी देखील स्टुडिओ मध्ये नेहुंन अनेक गाणी रेकॉर्ड करून घेतली. तसेच भारत देशासोबत बाहेर देखील तिचं एक गाणं चाललं आहे.

 

हे गाणं बांगलादेश मधील एका दिग्गज व्यक्तीने रानू कडून गाऊन घेतलं आहे. एक प्यार का नगमा या गण्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक विडिओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत राहिली आहे.

 

सध्या पुन्हा ती चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुष्पा हा चित्रपट आला होता. यातील श्रीवल्ली या गाण्यावर रानुने भन्नाट डान्स केला आहे. पगडी गुंडाळून हा डान्स तिने केला आहे. तसेच अंगात तिने टीशर्ट घातला आहे.

 

त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांच्या कॉमेंट या व्हिडिओवर येत आहेत. यापूर्वी देखील रानुचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button