राणी मुखर्जीची असिस्टंट हॉलिवूडमधील अभिनेत्रीची आहे बहीण.. सविस्तर वाचाच..

मुंबई| बॉलिवूडची बबली गर्ल म्हणून अभिनेत्री परिणीती चोप्राची ओळख आहे. अभियानाच्या बळावर तिने आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. आज म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी परिणीती आपला वाढदिवस साजरा करत आहे. 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणातील अंबाला येथे जन्मलेल्या परिणीतीला अभिनयात रस नव्हता. मात्र, चुलत बहीण प्रियांका चोप्रामुळे तिचा दृष्टीकोन बदलला. सध्या ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री असून वाढदिवानिमित्त जाणून घेऊया तिच्या विषयी काही रंजक गोष्टी.

Join WhatsApp Group

 

2011 मध्ये रिलीज झालेल्या ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत दिसली असेल, पण त्यानंतर ती लोकांच्या मनात घर करून गेली. परिणीती ‘इशकजादे’ चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप आवडला आणि हा चित्रपटही सुपरहिट ठरला.

 

अभिनयापूर्वी केले आहे असिस्टंट म्हणून काम:
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्यापूर्वी परिणीती हिने यशराज बॅनरमध्ये काम करत असताना अभिनेत्री राणी मुखर्जीची असिस्टंट म्हणूनही काम केले आहे. परिणीती म्हणते की, राणी ही पहिली व्यक्ती होती जिने मला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. परिणीती चोप्रा ही अभिनयासह गायनासाठी देखील ओळखली जाते. ती एक शास्त्रीय गायिका आहे, तिने बॉलिवूडमध्ये ‘माना की हम यार नहीं’ आणि ‘तेरी मिट्टी’ या दोन गाण्यांचे फिमेल व्हर्जन गायले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button