आत्ताच्या घडामोडी

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेताच्या परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर

पुणे | गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली रंग माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली आहे. काही दिवस TRP च्या बाबतीत ही मालिका अव्वल स्थानी राहिली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

याच मालिकेत श्वेता पात्र देखील रसिकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. मात्र श्वेताच्या परिवारावर आणि तिच्यावर सध्या दुःखाचा डोंगर पसरला आहे. कारण तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहून श्वेताने म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिने पोस्ट लिहली आहे.

 

यात ती खूपच भाऊक झाली आहे. तिच्या काकांचे निधन झाल्याचे वृत्त तिने दिले आहे. श्रद्धांजली देताना तिने एक भाऊक पोस्ट लिहली आहे. “खूप लवकर गेलास रे तू, काका नाही मित्र होतास तू, आपल्या खूप पार्ट्या पेंडिंग आहेत. नेहमी आपण भेटलो की वरण पोळीचा बेत करायचो.

 

तू कायम मला चांगलंच शिकवलं, अशा शब्दात तिने पोस्ट लीहली आहे. यावर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदविली आहे. 9 मे रोजी काही कारणामुळे निधन झाले आहे. त्यामुळे तिने ही पोस्ट लिहून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button