राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सुधारण्याच्या ऐवजी बिघडली; कुटुंबीय पोहचले मंदिरात

नवी दिल्ली | प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती संधर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्या तब्येती बद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर आहेत. अशात त्यांना ठीक वाटावे म्हणून त्यांच्या पत्नी एका गुरुद्वारामध्ये आल्या होत्या. इथे प्रार्थना केल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, राजू यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत. कृपया त्यांच्या निधनाची अफवा पसरवू नका.

 

राजू यांचे भाऊ काजू श्रीवास्तव यांचे मेहुणे प्रशांत यांनी सांगितले की, ” जसे देशातून सर्व व्यक्ती राजू यांच्या साठी प्रार्थना करत आहेत. तसेच आम्ही देखील करत आहोत. त्यांच्या तब्येतीत काल सुधारणा झाली होती असे डॉक्टर म्हणले. मात्र अजूनही ते व्हेंटिलेटर आहेत.

 

प्रशांत यांनी सांगितले की, माझ्या पत्नीचे भाऊ काजू हे देखील याच दवाखान्यात उपचार घेत आहेत. मात्र आम्ही अजून त्यांना राजू यांच्या विषयी काही सांगितले नाही. शुक्रवारी राजू यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यांनी थोडी हालचाल केली होती. असे डॉक्टर म्हणले. मात्र अजूनही त्यांचा मेंदू काम करत नाही. त्यामुळे चिंता वाढत आहे. तसेच सुरू आलेले उपचार त्यांच्या मेंदू पर्यंत पोहचत नाही असे देखील समजत आहे. मात्र त्यांनी केलेली हालचाल हे एक सकारात्मक संकेत आहेत.

 

अशात त्यांच्या निधनाची अफवा सुरू असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यात त्यांनी लिहिले की, ” कृपया अशा अफवा पसरवू नका. आम्ही सर्व जण ते लवकर ठीक व्हावे अशी प्रार्थना करत आहोत. तुम्ही देखील त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. ते आता ठीक आहेत. हळूहळू प्रतिक्रिया देत आहेत. डॉक्टर देखील शर्थीचे प्रयत्न करत आहेत.”

 

१० ऑगस्ट रोजी जिम मध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना राजू यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात नेले. अशात त्यांच्या मुलीने सांगितले होते की, त्यांच्या मेंदूवर देखील याचा परिणाम झाला आहे. तसेच आता पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील त्यांची चौकशी केली आहे. त्यांचे काही व्यक्ती सातत्याने हॉस्पिटलमध्ये येऊन माहिती घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button