बॉलीवुड

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक; पुन्हा व्हेंटिलेटर बसवले

दिल्ली | प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशात काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती ठीक झाली होते. ते शुध्दीवर आले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होऊ लागले आहेत. नुकतीच त्यांच्या तब्येतीची आणखीन एक मोठी अपडेट समोर आली आहे. यात त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

 

राजू श्रीवास्तव यांना मंगळवारी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. तसेच त्यांची ऑक्सिजन पातळी सामान्य होऊन 80 ते 90 टक्के ते स्वतः ऑक्सिजन घेत होते. मात्र आता पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांना अंडर ऑब्सरवेशन ठेवले आहे.

 

9 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव दिल्लीत इरॉस हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर तिथेच ते व्यायाम देखील करत होते. मात्र इथे त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या छातीत खूप कळा येत होत्या. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले गेले. अशात बरेच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांच्या निधनाची अफवा पसरवली गेली होती.

 

गेल्या 23 दिवसांपासून राजू श्रीवास्तव हे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. 25 ऑगस्ट रोजी त्यांची ऑक्सिजन पातळी व्यवस्थित झाली होती. तसेच बीपी देखील नॉर्मल झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली आहे हे पाहून सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीविषयी समोर आलेल्या अपडेटमुळे चाहते चिंतेत आहेत. सर्व जण त्यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत आहेत. ज्यावेळी त्यांची प्रकृती नॉर्मल झाली असल्याचे समजले होते त्यावेळी सर्वच कुटुंबीय आणि चाहते फार आनंदात होते. मात्र आता राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवरून न काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.

 

राजू श्रीवास्तव यांनी आजवर आपल्या विनोदी अभिनयाने खूप लोकप्रियता कमावली आहे. त्यांच्या स्टँडअप कॉमेडीसाठी ते प्रसिद्ध आहेत. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून त्यांनी स्टँडअप कॉमेडीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी अनेक शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला. यातील गँग्ज ऑफ हसिपुर हा शो त्यांनी स्वतः होस्ट देखील केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button