राजू श्रीवास्तव यांच्या भावाची देखील प्रकृती गंभीर; रुग्णालयात घेत आहेत उपचार, अंतविधीलाही नाहीत पोहचू शकले

दिल्ली | प्रसिध्द विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पूर्ण देश रडला, राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. खूप दिवस मृत्यू सोबत झुंज देऊन अखेर ते अनिंतात विलील झाले आहेत.
व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यानंतर दिल्ली येथील एम्स रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. ४०हून अधिक दिवस रुग्णालयात उपचार घेऊन देखील त्यांच्या प्रकृती मध्ये विशेष सुधारणा आली नाही. आणि अखेर त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या अंतविधीला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली अनेक चाहते देखील अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र राजू यांचे सख्खे भाऊ अंतिम दर्शन घेण्यासाठी आले नसल्याने एकच खळबळ उडाली होती.
राजू यांचे भाऊ काजू हे उपस्थीत नव्हते. सध्या त्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा होऊ लागली आहे. काजू यांची देखील सध्या प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ते अंतविधीला येऊ शकले नाही. जेव्हा राजू एम्स रूग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी काजू यांच्यावर देखील त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते.
सध्या त्यांची प्रकृति देखील गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. काजू यांच्या पत्नी देखील प्रेग्नेंट आहेत. यामुळे ते अंतविधीला पोहचू शकले नाहीत. सध्या त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.