राजू श्रीवास्तव यांचा मेंदू निकामी; कुटुंबाकडून मोठा खुलासा
दिल्ली | कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत अजूनही काहीच सुधारणा झालेली नाही. चार दिवस होऊन देखील त्यांचा मेंदू कार्य करत नाही. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. अशात त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिढले. या सर्व अफवा असल्याचे त्यांनी लगेच स्पष्ट केले. त्यांची पत्नी गुरुद्वारामध्ये प्रार्थना करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने माध्यमांना या सर्व अफवा असल्याचे सांगितले. मात्र आता पुढचे काही तास त्यांच्या तब्येतीवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
बुधवारी राजू श्रीवास्तव यांना एम्स रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर लगेचच त्यांची एंजियोप्लास्टी करण्यात आली. यावेळी त्यांच्या हृदयात १०० % ब्लॉकेज असल्याचे समजले. त्यानंतर शुक्रवारी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे समजले. कारण त्यांनी पायाच्या बोटांची हालचाल केली. मात्र त्या नंतर त्यांच्यात कोणतीच हालचाल झाली नाही. त्यांनी प्रतिक्रिया देणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस कुटुंबीय खूप आशेवर आहेत.
एम्स रुग्णालयातील सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. संदीप सेठ यांनी सांगितले होते की, पुढील तीन दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यातील शुक्रवार हा पहिला दिवस आहे. शुक्रवारी त्यांच्या बोटांची हालचाल जाणवली असली तरी, अजून फार सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. तसेच आता पर्यंत त्यांना ५० % ऑक्सिजन दिला होता. आता तो ४०% केला गेला आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षामंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, अशा काही मोठ्या व्यक्तींनी त्यांची विचारपूस केली आहे. अशात त्याचे भाऊ सीपी श्रीवास्तव यांनी सांगितले की, PMO आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसमधून सातत्याने माझ्या भावाची चौकशी केली जात आहे.
तसेच देशातील प्रसिद्ध डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे. राजू यांचे भाऊ काजू हे देखील याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या कानाला खाली गाठ आल्याने यावर त्यांचे उपचार सुरू आहेत. मात्र या बाबत अजून त्यांच्या भावाला काहीच माहिती दिलेली नाही.
राजू श्रीवास्तव यांना हृदयाच्या समस्या खूप वर्षांपासून आहेत. या आधी त्यांनी १० वर्षांपूर्वी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात आणि ७ वर्षे आधी लीलावती रुग्णालयात एंजियोप्लास्टी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही शस्त्रक्रिया केली गेली.