राजा राणीची ग जोडी ‘ या मालिकेचा होणार शेवट..

मनोरंजन| छोट्या पडद्यावर सध्या राजा राणीची ग जोडी ही मालिका प्रचंड गाजत आहे. यातील संजू आणि रणजीत यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. संजूच्या भूमिकेत शिवानी सोनार ही अभिनेत्री दिसली आहे. शिवानी सोनार हिने चांगल्या प्रकारे काम केले आहे, तर आता या मालिकेचा शेवट कसा होणार याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

 

Advertisement

रंजीत आणि संजू यांचे लग्न कशाप्रकारे होते. रंजीत याचे लग्न संजूच्या बहिणी सोबत ठरलेले असते. मात्र ती पळून गेल्यामुळे त्यानंतर रणजीतला संजू सोबत लग्न करावे लागते. त्यानंतर या दोघांचा संसार सुरू होतो. त्यानंतर संजू ही ढाले पाटलांची सून म्हणून घरात वावरते आणि त्यानंतर ती पोलीस दलामध्ये सहभागी होते.

 

Advertisement

मात्र वय लपवल्यानंतर रणजीत याला कोठडी देखील होते. मात्र, संजू ही नंतर गेलेली वर्दी देखील परत मिळवते आणि रणजीत याला देखील पोलिसात पुन्हा भरती करून घेते. सध्या अपर्णाची मोठी बहीण दमयंती ही ढाले पाटलाची मोठी सून म्हणून घरात मोठ्या थाटात वावरत आहे. अनेक कटकारस्थान केल्यानंतर राया याचा बिमोड करण्यात रंजीतला मोठे यश आल्याचे आपण आजवर पाहिले आहे.

 

मालिकेच्या शेवटी आता रणजीत याला त्याचे सासरे पंजाबराव हे त्याला मदत करताना दिसणार आहेत. त्यासोबतच दादासाहेब आणि दमयंती यांची रवानगी देखील तुरुंगात झाल्याचे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. यामुळे आईसाहेब आणि रजनी साहेब या सगळ्यांनाच आता न्याय मिळताना या मालिकेत आपल्याला दिसणार आहे.

 

संजू ही मोठी पोलीस ऑफिसर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे या मालिकेचा शेवट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *