Railway Bharati 2026 | दहावी पास उमेदवारांसाठी केंद्राच्या रेल्वे विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. तब्बल ५३४९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे फक्त दहावी पास झालेल्या उमेदवरांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दहावीत फक्त ५० टक्के गुणांहून अधिक गुण घेऊन पास झालेले सर्व विद्यार्थी या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात नोकरी करावी लागणार आहे. या नोकर भरतीसाठी शासनाने अर्ज मागविले आहेत. अनेक दिवस नोकर भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमदेवराना केंद्र शासनाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारने व रेल्वे मंत्रालयाने RRC/WR/04/2025 या जाहिरात क्रमांकाने जाहिरात प्रसारित केली आहे.
- पदाचे नाव (post name) – अप्रेंटिस
- मंजूर केलेल्या जागा – ५३४९ (पाच हजार तीनशे एकोन पन्नास)
- प्रकाशित केलेला जाहिरात क्रमांक – RRC/WR/04/2025
- शैक्षणिक पात्रता – १० वी (५०% गुण घेऊन पास झालेले)
- वयो – मर्यादा – २३/०३/२०२६ रोजी १५ ते २४ मधील उमेदवार, ST – SC – ५ वर्ष सूट तर OBC साठी ३ वर्ष सूट दिलेली आहे.
- अर्ज रक्कम – जनरल आणि OBC साठी १०० रुपये तर इतरांसाठी ०० रुपये अर्ज रक्कम देण्यात आली आहे.
- परीक्षा तारीख – अर्ज केल्यानंतर परीक्षा तारीख नंतर कळवली जाईल.
- अर्ज सुरू झालेली तारीख – २१/फेब/२०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – २३/मार्च/२०२६ रात्री ५ पर्यंत.
Important Links
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांसाठी महत्वाची माहिती –
अर्ज करण्याच्या अगोदर संबंधित भरती प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र आहात का याची लक्ष पूर्वक शहानिशा करून घ्या. संबंधित भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचा. १० वी पास वर नोकरी आहे म्हटल्यावर अनेकजण अर्ज करतात, मात्र त्यासाठी जी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचा सराव तुम्ही करत आहात का? याची एकदा खात्री करा. संबंधित रेल्वे डिपार्टमेंट हे केंद्र सरकारचे आहे.
या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून लाखो अर्ज येऊ शकतात. अर्ज भरताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वाचून भरा. तुम्ही जर या भरतीसाठी मोबाईल वरून अर्ज करत असाल तर संबंधित वेबसाईट मोबाईल फ्रेंडली आहे का? ते अगोदर तपासून घ्या. जर वेबसाईट मोबाईल वर व्यवस्थित ओपन होत नसेल तर कंप्यूटर चा वापर करा. जर तुम्हाला अर्ज कसा भरायचा यासमंधी काही माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या महा इ सेवा केंद्रात जाऊन संबंधित भारतीसाठी अर्ज दाखल करा.
अर्ज संपूर्ण दाखल केल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध केले जाते. प्रवेश पत्र कधी येणार याचे अपडेट तुम्ही संबंधित वेबसाईट वर वारंवार तपासा. प्रवेश पत्र आल्यानंतर त्याची एक झेरॉक्स कॉपी घ्या, त्यानंतर त्याला लॅमिनेशन करून घ्या. त्यावर असलेल्या सर्व नियम अटी व्यवस्थित वाचा. नियम अटींचे उल्लंघन कोणत्या उमेदवाराकडून झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
रेल्वे मध्ये भरती झाल्यानंतर पगार आणि इतर सुविधा मिळतात. त्यामुळे देशातील लाखो उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. संबंधित भरतीसाठी केंद्र शासनाचे काही नियम लागू होतील, जर तुम्ही या भरती मध्ये यशस्वी झाला तर तुम्हाला जॉइनिंग लेटर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल. अनेक उमेदवारांची रेल्वे विभागात काम करण्याची इच्छा असते, त्यासाठी अनेकजण अभ्यास करत असतात.
या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना देशातील कोणत्याही राज्यात काम करावं लागणार आहे. या भरतीमध्ये १५ वर्षांपासून ते २४ वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लहान वयातील तरुणांना नोकरी उपलब्ध होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देण्यात आली आहे. त्यांनतर शासनाकडून एक नोटिफिकेशन जारी करून परीक्षेची दिनांक दिली जाणार आहे. या भारतमध्ये जागा संख्या जास्त असल्याने अनेकांना संधी मिळू शकते. या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी दहावीला ५० टक्केहून अधिक गुण घेऊन विद्यार्थी पास झालेला असावा. त्याचे पास झालेले प्रमाणपत्र मूळ प्रत त्याच्याकडे असणे अनिवार्य आहे.











