मराठी कलाकारांचा लंडनमध्ये राडा; चक्क एकमेकांच्या जीवावर उठलेत

लंडन | हिंदी वाहिन्यांप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये कॉमेडी शोचा मोठा बोलबाला पाहायला मिळतोय. या शोच्या माध्यमातून टीआरपी खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळेच असे शो सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सुद्धा तुफान गाजत आहे. या शोमध्ये सगळेच कलाकार हे तुफानरित्या कॉमेडी करत आहेत. या शोचा सई ताम्हणकर हिन एका स्पर्धकाला चार्मिंग अशी देखील पदवी दिली होती. अर्थातच महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील गौरव मोरे होय.
या शोमध्ये त्याला वेगळ्या अर्थाने ओळख मिळाली आहे. गौरव मोरे याने ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये त्याची अतिशय विनोदी भूमिका होती. त्याचीही भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती.
मात्र, त्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमुळेच ओळख मिळाली. आता गौरव मोरे याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरे हा प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत वाद घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेता निखिल चव्हाण याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लंडन मिसळ या चित्रपटासाठी गौरव मोरे करतोय काम – काही दिवसांपूर्वी गौरव मोरे यानं मुंबई एअरपोर्टवर अभिनेते भरत जाधव यांच्यासह फोटो शेअर केला. आणि लंडन मिसळला जात असल्याची त्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.
हास्य जत्रेतला गौरव मोरे यान केलं संजू या चित्रपटात काम – गौरव मोरे यान संजू या चित्रपटात खूप छोटी भूमिका केली होती. तरीही तो खूप मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेलाय. एवढच नाही तर याआधी त्याचे दिग्दर्शक राजकुमार हिरानीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत.