रात्रीस खेळ चाले मालिका फेम शेवांताचा नवरा दिसतो खुपचं देखणा; करतो हे काम

मुंबई | ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरू झाली. ही मालिका पहिल्या भागात प्रचंड गाजली आहे. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग देखील चित्रित करण्यात आला होता. मात्र, मालिकेच्या तिसऱ्या भागासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण की गेल्या दोन वर्षापासून जगासह देशभरामध्ये कोरोना महामारीने प्रचंड थैमान घातले आहे. या मालिकेमध्ये शेवंता आणि अण्णा नाईक यांची जोडी प्रेक्षकांना ही प्रचंड आवडत आहे.
आम्ही आज आपल्याला या मालिकेतील शेवंता बद्दल माहिती देणार आहोत. शेवंता ही भूमिका अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेली आहे. तिने ‘आभास हा’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचा जन्म 27 डिसेंबर 1988 साली दादर येथे झाला आहे.
दादर येथे तिने रुपारेल कॉलेज येथून बी ए एम एस मध्ये पदवी मिळवलेली आहे. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने अनेक मालिका व चित्रपटातून देखील काम केलेले आहे. तिला व्यावसायिक रंगभूमीवर देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मालिकांमध्ये प्रत्येक चॅनलवर तिने भूमिका केलेल्या आहेत. तिचा पहिला विवाह झाला होता पण त्यानंतर ती विभक्त झाल्याच समजतंय.तरीही अजून ते स्पष्ट झालं नाही.