फक्त २ लाखात घरी आणा TATA SIERRA, जाणून घ्या कॅलक्युलेशन

February 25, 2026 3:47 PM

Tata Sierra Car | सध्या भारत देशामध्ये टाटा सिएरा कारची चांगलीच क्रेझ आहे. ९० च्या दशकातील या कारने २०२६ मध्ये चांगलाच धुराळा केलाय, भल्या – भल्या SUV कारला टक्कर देऊन ५ स्टार रेटिंगसह ही गाडी मार्केटमध्ये चांगलीच धुमाकूळ घालत आहे. खिशाला परवडेल अशी ही गाडी टाटाने ग्राहकांसाठी काढली आहे. SUV फिलींग देणारी कार घेण्यासाठी नेमका महिन्याला किती उत्पन्न हवे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. Tata Sierra ही एक मिड साईज SUV कार मध्ये मोडणारी कार आहे. टाटा मोटर्सने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ही कार खरेदीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या कारची बाहेरील बॉडी ही बॉक्सी आहे. त्यामुळे या गाडीचा रोड प्रेसेंस खूप जास्त आहे. विशेष म्हणजे या गाडीला फ्लश डोअर देण्यात आले आहे, त्यामुळे स्टाईल च्या बाबतीत त्याला अनेक ग्राहकांनी पसंती दिली आहे.

गाडीच्या चाकांविषयी बोलायचे झाले तर १९ इंच आलाय व्हील देण्यात आले आहेत. त्यामुळे जेव्हा ही कार रस्त्यावरून धावते त्यावेळी ती उठून दिसते. तसेच गाडीच्या समोर स्टाइलिश LED देण्यात आले आहेत. त्यामुळे कितीही अंधार असला तरी स्पष्ट पणे समोरच दिसते. या कारच्या डैशबोर्ड कडे पहायचं झाल तर तीन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. तसेच या कारसोबत 5G कनेक्टिविटी देखील मिळणार आहे.

त्याच बरोबर टाटा मोटर्सचे iRA नावाच्या एप्लीकेशन सोबत ही कार जोडण्यात आली आहे. काही कंट्रोल त्या ऍप मधून करता येणार आहेत. जसे की लॉक अनलॉक, हॉर्न त्यासोबतच चार्जिंग किती टक्के आहे. तसेच गाडी कोणत्या लोकेशन वर आहे. अशा बऱ्याच गोष्टी या ऍप मधून कळत आहेत. त्यामुळे ही कार हाताळणे अधिक सोयीस्कर बनले आहे.

ही कार खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर १३ लाख ३० हजार पासून ते २५ लाख ८० हजारांमध्ये ऑन रोड मिळेल. जर ही कार तुम्हाला खरेदी करायची असेल तर समजा तुम्ही २ लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बाकीच लोन करून महिन्याला २८ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत हप्ता येऊ शकतो. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असल्याने हप्त्याची एक्झॅक्ट अमाऊंट सांगता येणार नाही.

पण जर तुमचा सिबिल स्कोर आणि इनकम सोर्स चांगला असेल तर कमी व्याजदरात म्हणजेच ८.५०% मध्ये कर्ज मिळू शकते तसेच ७ वर्षांपर्यंतची परत फेड मिळू शकते. त्यामुळे तुमचा जर १ लाख फिक्स इनकम असेल तर ही कार तुमच्यासाठी योग्य राहील. ही कार खरेदी करण्यासाठी २ ते ३ महिन्याचा वेटिंग पीरियड आहे.

या गाडीच्या पार्श्वभूमीवर एक नजर टाकू
टाटा सिएरा भारतामध्ये १९९१ आली बाजारात विक्री साठी आली होती. मात्र त्याकाळील अनेक कार्स चांगल्याच मार्केट गाजवत होत्या. त्यामुळे टाटा सिएरा या कारला जास्त काळ मार्केट मध्ये टिकता आले नाही. या काळी लोकांच्या सांगण्यावरून या कारची किंमत देखील जास्त होती. त्यामुळे याचे जास्त युनिट विकले गेले नाहीत. म्हणून याकारचे production थांबविण्यात आले.

मात्र २०२५ ची बाजारामधील हालचाल बघून पुन्हा ताटाने या कारची निर्मिती केली. ५ स्टार रेटिंग मिळविल्या, Sierra To Sierra धडक experience करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवली आज ही कार घेण्यासाठी अनेक हौसे लोक वेटिंगवर आहेत. त्यामुळे या कारचे मार्केट ९० दशकात नव्हते पण आता त्याकाळी सेल न झाल्याने बंद केलेल्या मॉडेल ला सोन्याचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.

टाटा एक भारत देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील विश्वसनीय ग्रुप आहे. त्यांनी लहान वर्गापासून मोठ्या वर्गाला परवडेल अशा कार बाजारात आणून स्वतःची मजबुती लोकांच्या मनात कायम केली आहे. टाटा या समूहाची सर्वाधिक विक्री आणि यशस्वी कार ही Nexon आहे. अनेक फिचर्स त्या कार मध्ये देखील देण्यात आले आहे.
.
टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनानंतर ही कंपनी कशी चालणार याचा सर्वांना प्रश्न पडला होता. टाटा ग्रुपने लोकांच्या जीव मोठ्या अपघातातून कसा वाचला पाहिजे यासाठी विशेष लक्ष दिले आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर मार्केट मध्ये चांगली प्रतिमा तयार झालेली टिकून राहील की नाही. असा प्रश्न अनेकांना पडला होता.

मात्र त्यांच्या निधनानंतर देखील या ग्रुपने कोणत्याही गोष्टीमध्ये compromize केलेली नाही. हा ग्रुप त्यांची quality कायम मेन्टेन करत आहे. त्यामुळे भारत देशातील नागरिकांची या टाटा सिएरा कार ला मोठी पसंती मिळत आहे. दिवसेंदिवस या कारची क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे.

Faq – हे प्रश्न कार घेताना वारंवार विचारले जातात. 

जुनी टाटा सिएरा बंद का झाली? उत्तर – जुनी गाडी किंमत जास्त होती त्यामुळे गाडीचा सेल होऊ शकला नाही म्हणून नाईलाजाने २००० साली गाडीचे उत्पादन बंद करावे लागले.

जुन्या गाडीला किती दरवाजे होते? उत्तर – जुन्या टाटा सिएरा ला तीन दरवाजे होते. त्यामुळे ती अतिशय आकर्षित वाटत होती.

जुनी गाडी काढताना टाटा ने काय विचार केला होता?उत्तर – सर्वसामान्य आणि लहान पुढारी यांना विक्रीचे टार्गेट होते.

नवीन टाटा सिएरा गाडीची मुळात किंमत किती आहे? उत्तर – नवीन टाटा सिएरा ची किंमत भारतात १३ लाखांपासून ते २६ लाखांपर्यंत onroad आहे.

या गाडीला सुरक्षा रेटिंग किती देण्यात आली आहे? उत्तर – या गाडीची सुरक्षा रेटिंग ही ५ स्टार देण्यात आली आहे. यामुळेच ही गाडी प्रसिद्ध झाली आहे.

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment