आत्ताच्या घडामोडी

‘या’ कारणामुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सोडणार प्रार्थना?

पुणे | झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांनी प्रेक्षक वर्गाला अक्षरशः आपल करून घेतलं आहे. दिवसभर काम करून रात्री मालिका चालू होण्याच्या वेळेला प्रेक्षक जाहिराती देखील सोडत नाहीत. मालिका संपेपर्यंत ती पाहतात.

 

अशीच एक झी वरील मालिका माझी तुझी रेशीमगाठ तुम्हाला माहित असेल. या मालिकेने देखील प्रेक्षकांना आपलं करून घेतलं आहे. TRP च्या बाबतीत ही मालिका अनेक दिवस अव्वल ठरली आहे. यात बालकलाकार परीचा मुख्य रोल दिसतो.

 

परीच्या रोल मुळे ही मालिका प्रेक्षक वर्गाला चांगलीच आवडू लागली आहे. या मालिकेत परीच्या भूमिकेत मायरा वैकुळ या चिमुकल्या मुलीने भूमिका साकारली आहे. आणि या पत्राला प्रेक्षक वर्गाने डोक्यावर घेतलं आहे.

 

यात श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे अशी मुख्य स्वरूपात असलेल्या दिग्गजांची नावे आहेत. मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहीती समोर आली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली प्रार्थना ही मालिका सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

काही कालावधी साठी या मालिकेतून ती ब्रेक घेण्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मालिकेला एक वेगळं वळण लागणार आहे. मालिकेचा पुढील भाग असा असू शकतो – एका कामासाठी प्रार्थना काही दिवसांसाठी गावाला जाते.

 

आणि त्यानंतर परीची पूर्ण जबाबदारी ही श्रेयस वर येते, आणि प्रार्थना गावाकडे जात असताना, परी तिला परीला सोडून जावस वाटत नाही. मात्र तिच्यापुढे कोणताही पर्याय नसतो आणि ती गावाकडे जाते. आणि त्यानंतर श्रेयस वर सर्व जबाबदारी येते.

 

असे या मालिकेच्या पुढील भागात दाखवले जाऊ शकते. प्रार्थना बेहेरे ही तिच्या कामासाठी भारत देशाच्या बाहेर जाणार आहे. यासाठी मालिकेत थोडा बदल होणार आहे. अत्यंत महत्वाचे काम असल्यामुळे प्रार्थना जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button