आत्ताच्या घडामोडीमनोरंजन

प्रदीप पटवर्धन यांची होती वेगळीच छाप; त्यांच्या निधनाने गिरगावात आसवांचा पूर

मुंबई | प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रभर रडू लागला. अशात गिरगाव भागात तर मोठा शोक पसरला होता. कारण प्रदीप पटवर्धन हे गिरगावचे राजा होते. ते कितीही मोठे स्टार झाले तरी त्यांना साधी राहणी खूप आवडायची.

 

त्यामुळे ते नेहमी आपल्या गिरगावात असलेल्या घरी जायचे. या जुन्या घरातच त्यांचा जन्म झाला होता. या घराशी त्यांची नाळ पक्की बांधलेली होती. त्यामुळे त्यांनी याच घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अख्खं गिरगाव ओक्साबोक्षी रडू लागल होतं.

 

प्रदीप पटवर्धन हे गिरगावच्या घरातच लहानाचे मोठे झाले. त्यांनी नोकरी आणि नाटक नंतर चित्रपटात काम केले. ते खूप मोठे स्टार झाले मात्र त्यांनी कधीच स्वतःची वाहवा करून घेतली नाही. अतिशय साध्या आणि निर्मळ मनाचे ते होते. गिरगावात गणपती बाप्पाच्या आगमनाला ते नेहमी हजर असायचे बाप्पाचे मोठ्या गाजावाजात स्वागत करायचे.

 

तसेच दहीहंडी म्हणजे गोपाळ कालामध्ये देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचे. यावेळी डोक्यावर गोविंदा आला रे अशी पट्टी बांधून ते नाचायचे. यावेळी त्यांचा अफलातून डान्स पाहायला गिरगावात घरातील खिडक्या आणि बाल्कनीमध्ये मुलींची गर्दी उफाळून यायची. कारण तिथे सर्व जण त्यांना अमिताभ बच्चन समजत होते.

 

प्रदीप पटवर्धन यांनी नेहमी आकाशात झेप घेताना आपले पाय जमिनीवर ठेवले. कितीही मोठे झाले तरी जुनी माणसं आणि मातीशी जोडलेली त्यांची नाळ त्यांनी घट्ट ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने गिरगावात आसवांचा पूर आला होता. त्यांनी नेहमी आपल्या आईच्या इच्छाचे पालन केले. त्यांनी आईसाठी आपली बँकेतली नोकरी कधीच सोडली नाही. तसेच अभिनयात देखील ते सक्रिय राहिले. त्यांनी अनेक नाटकामध्ये काम केले. मोरूची मावशी हे नाटक त्यांच्या एका एन्ट्रीने गाजत होते. या नाटकाचे दोन हजारांहून जास्त प्रयोग झाले होते.

 

प्रदीप यांनी बायको असून शेजारी, लग्नाची बेडी, टूर टूर या नाटकांमध्ये देखील अफलातून अभिनय केला होता. तसेच नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील त्यांची बाबू कालिया ही भूमिका खूप गाजली होती. या भूमिकेतून त्यांचा चाहता वर्ग अधिक वाढला होता. चश्मेबहाद्दर या चित्रपटात देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते १२३४, गोळा बेरीज, एक फुल तीन हाफ, लावू का लाथ, परीस, जमलं हो जमलं, भुताळलेला अशा चित्रपटांमध्ये अभिनय आणि निर्मितीचे काम करताना दिसले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button