Poultry Farm Business 2026 | शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना काबाड कष्ट करण्याची आवश्यकता नाही तर डोकं लावून शेती करणं आणि त्यातून चांगला नफा कमविणे हे सध्या शेतकऱ्यांच्या शेतीच गणित आहे. शेतीत पूर्वी सारखे काबाड कष्ट कमी झाले मात्र उत्पन्नाची आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. म्हणून अनेक शेतकरी मागील काही वर्षांच्या तुलनेत लॉस मध्ये असलेले पहायला मिळत आहेत. मात्र शेती व्यवसाय जर डोक्याने केला तर शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. शेती सोबत एखादा जोडधंदा केल्यास शेती आणि जोडधंद्यातून येणारे उत्पन्न यातून मोठ गणित जुळू शकते. त्यामुळे जोडधंदा काय करावा? केलेल्या जोडधंद्यातून नफा मिळेल का? जोडधंदा शेती सोबत योग्य पद्धतीने सांभाळता येईल का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाले आहेत. या लेखाच्या माध्यमातून आपण आज या सर्व प्रश्नांवरील उपाय सांगणार आहोत. Poultry Farm Business Planing 2026
शेतामध्ये चांगला नफा कमवायचा असेल आणि तुम्ही त्यासोबत एक जोडधंदा करू इच्छित असाल तर आज आपण शेती सोबत केला जाऊ शकणाऱ्या अशा एका व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही कुकुटपालन या व्यवसायाकडे येऊ शकता, शेतातून या व्यवसायाला सांभाळले जाऊ शकते. पोल्ट्री फॉर्म हा व्यवसाय मुळात शेतकऱ्यांचा आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून देशातील लाखो शेतकरी मोठा नफा कमवीत आहेत. मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक शेतकरी या व्यवसायाकडे जात नाहीत किंवा चालू केलेला व्यवसाय काहीच दिवसात बंद करतात. मात्र कुकुटपालन हा व्यवसाय योग्य पद्धतीने केला तर या व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाची योग्य निवड आहे. कुकुटपालन हे शेतामध्ये करता येते शहरात किंवा लोकवस्तीच्या ठिकाणी या व्यवसायाला परवानगी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्यवसाय शेतामध्ये सुरू केला आहे. हा व्यवसाय मुळात तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. पहिली पद्धत म्हणजे स्वतःच पक्षी टाकने त्यांची निगा राखणे आणि त्यानंतर त्याची मार्केट मध्ये विक्री करणे, दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या शेतामध्ये बांधलेल्या शेडमध्ये कंपनीचे पक्षी टाकने खाद्य कंपनीचे घेणे निगा राखणे आणि पक्षी परत कंपनीला देणे. आपण या दोन्ही गोष्टी स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. Poultry Farm Business mahiti
१) स्वतः गुंतवणूक करून व्यवसाय करणे? (How much investment poultry farm)
कुकुटपालन व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःच्या मालकीच्या जमिनीत पोल्ट्री फार्मसाठीचे शेड बांधून त्यामध्ये पक्षी, खाद्य, औषधे, निगा राखणे, बाजारात विकणे या सर्व गोष्टी स्वतःला कराव्या लागतात. जर तुम्ही गावरान कुकुटपालन करत असाल तर हा एकच पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र बॉयलर कुकुटपालनासाठी तुमच्याकडे वरील दिलेला दुसरा पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्ही या व्यवसायात स्वतः गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला यातून मोठा नफा होऊ शकतो, मात्र त्याच पटीमध्ये तुम्हाला यामध्ये मोठा तोटा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेडमध्ये चिक्स टाकले त्यांना खाद्य दिले, औषधेही दिली, आणि अचानक एखादी महामारी किंवा आजार आला आणि त्यात तुमच्या वाढवलेल्या पक्षांची मोर्टेलिटी झाली तर याचा फटका तुम्हाला बसेल. मात्र यातून जर तुम्ही सुखरूप बाहेर पडला तर पर्याय दोन पेक्षा ३ ते ४ पट तुमचा मोठा नफा देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर कुकुटपालन व्यवसायाची पूर्णपणे माहिती असेल तर तुम्ही स्वतः गुंतवणूक करून हा व्यवसाय योग्य रीतीने यशस्वी करू शकता. Poultry Farm Subsidy Maharashtra
२) कंपनीला भाडेतत्वावर शेड देणे (Poultry Farm Rented)
हा पर्याय या व्यवसायात उतरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरक्षित मानला जातो. या व्यवसायात शेतकऱ्यांना मोठ इंवेसमेंट करण्याची आवश्यकता नाही. फक्त सुरुवातीला तुम्हाला शेड बांधण्यासाठी लागणारा खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही अनेक कंपन्यांना तुमचे शेड भाडेतत्वावर देऊन त्यातून चांगली कमाई तुम्ही करू शकता. बाजारात प्रीमियम, बारामती ऍग्रो, आनंद ऍग्रो या कंपन्या शेतकऱ्यांना चांगला नफा देत आहेत. या कंपन्यांना तुम्ही बांधलेले शेड भाडेतत्वावर दिल्यानंतर तुम्ही फक्त ४५ दिवस त्या पक्षांची निगा राखायची त्यानंतर कंपनी ते पक्षी घेऊन जाऊन त्याची विक्री करते. त्यामध्ये पक्षांसाठी लागणारे खाद्य, पक्षांसाठी लागणारे औषधे ही कंपनी पुरविते, त्यामुळे शेतकऱ्यांची यामुळे मोठी गुंतवणूक होत नाही. आणि शेतकरी सुरक्षित राहतात. मात्र पर्याय पहिल्या पेक्षा कमी नफा यातून होतो.
कुकुटपालन व्यवसाय शेतीसाठी चांगला
पोल्ट्री फार्म हा व्यवसाय तुमच्या शेतीसाठी चांगला मानला जातो. उदाहरण तुमच्याकडे ५ एकर जमीन आहे. मात्र त्यातील १० ते १२ गुंठे जमीन तुमच्या उपयोगी येत नाही किंवा त्या जमिनीमध्ये जर तुमचे उत्पादन इतर जमिनीसारखे मिळत नाही, अशा जमीनीत तुम्ही हा व्यवसाय करू शकता. त्यातून निघणारी विष्टा म्हणजेच कोंबड खत वापरून तुमची जमीन तुम्ही सुपीक बनवून उत्पादन वाढवू शकता. तुमच्या स्वतःच्या पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड खत तयार झाला असल्यामुळे तुम्हाला तो विकत घेण्याची गरज भासत नाही. आणि यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पादन खर्चात घट पाहायला मिळेल. सोबतच तुम्ही कोंबड खत हा इतर शेतकऱ्यांना देखील विकू शकता यातून देखील तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
गावरान पोल्ट्री व्यवसायातून देखील जास्त कमाई
गावरान पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करून त्यातून देखील चांगली कमाई केली जाऊ शकते. गावरान कोंबड्यांसाठी कंपनीचे खाद्य लागत नाही, त्या स्वतःसाठी स्वतः चारा शोधतात, त्यामुळे त्यांना बाहेरच्या प्रीमियम खाद्याची गरज भासत नाही. त्याच बरोबर बॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत गावरान कोंबड्यांना आजार कमी असतात, त्यामुळे त्यांची मर होत नाही. मात्र बॉयलर कोंबड्या 45 दिवसात विकण्या योग्य होतात. पण गावरान कोंबड्यांना 80 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. गावरान पोल्ट्री फार्म हे कोणत्याच कंपनीला भाडेकरारावर दिले जाऊ शकत नाही.
निष्कर्ष – शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे तुम्ही येऊ शकता, सुरुवातीला तुम्ही तुमचे पोल्ट्री शेड कंपन्यांना भाडेतत्वावर देऊन नंतर त्यातून अनुभव आल्यानंतर स्वतः गुंतवणूक करून यातून चांगली कमाई करू शकता. या व्यवसायात देशातील लाखो लोक उतरली आहेत. ७० टक्क्यांहून अधिक लोक यशस्वी देखील झाले आहेत. त्यामुळे तुमच्यामध्ये जर हा व्यवसाय सांभाळण्याची क्षमता असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. कंपनीकडे जर भाडेतत्वावर करार केल्यास चालू चिकन मार्के दरानुसार तुम्हाला कंपनी पैसे देते, ती अमाउंट कंपनी फिक्स ठरवून देत नाही. तुम्ही केलेल्या कष्टांवर देखील त्याच गणित अवलंबून असते. Kukutpalan mahiti




