आत्ताच्या घडामोडी

बॉलिवुडवर शोककळा! प्रसिध्द अभिनेता आणि निर्मात्याचे वयाच्या 74व्या वर्षी निधन

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. 2022 हे वर्ष अभिनय क्षेत्रासाठी धोक्याच मानले जात आहे. या वर्षात अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. कोणी हृदयविकाराच्या झटक्याने जात आहे.

 

तर काही विविध आरोग्य प्रश्नांनी जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जागतिक दर्जाची गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पूर्ण देशासह जगावर शोककळा पसरली होती.

 

त्यानंतर रमेश देव आणि बप्पी लहीरी या सारख्या दिग्गजांवर काळाने घाला घातला. यामुळे 2022 हे वर्ष अभिनय क्षेत्रासाठी धोक्याच मानले जात आहे. या वर्षात अनेक कलाकारांचे आरोग्य देखील धोक्यात आल्याचे आपण पाहिले आहे.

 

मात्र सध्या भारतीय चित्रपट सृष्टीला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एका प्रसिध्द निर्मात्याचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूड सहित हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरल्याचे सांगण्यात येत आहे.

 

भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द निर्माते मोहम्मद रियाझ यांचे आज वयाच्या 74व्या वर्षी मुंबई मध्ये निधन झाले आहे. ते एक अभिनेते देखील होते. त्यांनी शेकडो चित्रपट काढून अभिनय क्षेत्रात मोठं योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

त्यांनी बैराग, शक्ती, जबरदस्त, विरासत, महबुबा, अकेला, कमांडो, सफर, अपने पराये, समुंदर, राजपूत, बर्न माय बॉडी या सारख्या दिग्गज आणि प्रसिध्द चित्रपटांचे ते निर्माते होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button