चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! प्रसिध्द गायकाचे निधन; हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता

दिल्ली | सिनेसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज मंडळींच्या आकस्मित निधनाच्या अनेक बातम्या समोर येत आहे. अशात सिनेसृष्टीला पुन्हा एकदा एका दिग्गज गायकाच्या निधनाने धक्का बसला आहे. यामध्ये विशेष म्हणजे या गायकाचा मृत्यू चक्क गाणं गात असतानाच झाला आहे.

 

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एडवा बशीर यांचे काल म्हणजेच 28 मे रोजी रात्रीच्या वेळी ९.३० च्या दरम्यान निधन झाले. त्यावेळी ते एका कार्यक्रमात गाणं गात होते. केरळमधील अलप्पुझा येथे ब्लू डायमंड ऑर्केस्ट्रा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

 

यावेळी त्यांनी येसुदासचे ‘माना हो तुम बहुत हसीना’  हे गाणं गायलं. हे गाणं ऐकत तेथील सर्व व्यक्ती एडवा बशीर यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाले होते. पण कुणास ठाऊक या आनंदमयी क्षणाला अशा प्रकारे विरझन लागेल. गाणं गात असतानाच बशीर खाली कोसळले. यावेळी त्यांना लगेचच जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या प्रसिद्ध गायकाचा मृत्यू असाच लिहिला होता त्याला डॉक्टर तरी काय करणार. रुग्णालयात पोहचताच त्यांना तिथे मृत घोषित केले गेले.

 

त्यांच्या या लाईव्ह गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. अचान त्यांचे असे निधन झाल्याने संपूर्ण सोसेसृष्टी हादरली आहे. एडवा बशीर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन ते चित्रपट हिट ठरवले. त्यांनी स्वाथी थिरुनल या संगीत शाळेतून संगीताचे धडे गिरवले.

 

त्यानंतर त्यांनी साल 1972 मध्ये ‘कोल्लम संगीतालय गाणमेळा मंडळाची’ स्थापना केली. सिनेसृष्टीत त्यांनी ‘वीणा वैकुम’ या गाण्यातून पदार्पण केलं होतं. अशात आता सुरांचा हा राजा या भूतलावरून निखळला आहे. त्यामुळे सर्व कलाकार आपल्या सोशल मीडियावर दुःख व्यक्त करताना देखील दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button