आत्ताच्या घडामोडीगुन्हेगारी

मराठी चित्रपट सृष्टी हादरली! दिग्दर्शकाने केला लोकप्रिय अभिनेत्रीवर बलात्कार

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दिग्दर्शकाने 21 वर्षीय अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर आरोपीवर पोलिसांनी विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

 

गेल्या काही वर्षां पासून अमित प्रेमचंद सितलानी आणि सदर पीडित बॅकस्टेज अभिनेत्री यांची ओळख झाली होती. सितलाणी हा कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहत होता. गेल्या काही दिवसापासून तो सदर पीडित अभिनेत्रीला ब्लॅकमेल करून बलात्कार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

सदर आरोपीने अभिनेत्रींसोबत मैत्री वाढवली. आणि याचा गैरफायदा घेतला. त्यानंतर त्याने सदर अभिनेत्रीला मित्राच्या फ्लॅटवर बोलवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने अश्लील व्हिडिओ बनवले. त्यानंतर सदर आरोपी पीडित महिलेवर वारंवार बलात्कार करत असे.

 

त्याने पीडित अभिनेत्रीला अनेक लॉजवर नेहून धमकावून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार समोर आल्यावर मराठी चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button