Pmegp Loan Apply 2026: उद्योगांसाठी सुवर्णसंधी! ५० लाखांपर्यंत कर्ज, ३५% जबरदस्त सबसिडी; आजच अर्ज करा!

केंद्र सरकारने उत्पादन आणि सेवा व्यवसायांसाठी एक योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister Employment Genration Program 2026) या योजनेतून सूक्ष्म व्यवसायांसाठी अनुदान म्हणजेच सबसिडी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून ३५ टक्क्यांपर्यंत सबसिडी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे. आत्ता पर्यंत हजारो तरुणा - तरुणींनी या योजनेतून

February 21, 2026 5:40 PM

Pmegp Loan Apply 2026 | राज्यातील आणि देशातील हजारो तरुणांना व्यावसायिक बनायचे असत मात्र भांडवल नसल्यामुळे अनेकजण व्यवसायात पाऊल टाकत नाहीत. आणि कर्ज घेण्यासाठी बँकांकडे गेल्यानंतर बँका तारण काहीतरी मालमत्ता मागतात. त्यामुळे अनेक जणांचे व्यवसाय करण्याचं स्वप्न अपूर्ण राहते. जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे त्याचा संपूर्ण अभ्यास तुम्ही केला असेल तर आज आम्ही तुम्हाला या लेखनाच्या माध्यमातून कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता, ५० लाखापर्यंत बँकेकडून कर्ज कसे घ्यायचे याची सविस्तर माहिती देणार आहोत.

कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठलीही मालमत्ता तारण देण्याची गरज नाही. शासनाच्या अशा काही योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता, आणि त्यासाठी तुम्हाला असेस्ट लायबिलिटी किंवा मालमत्तेची गरज नाही. फक्त तुम्हाला तुम्ही जो व्यवसाय करणार आहात तो व्यवसाय कोणत्या फिल्ड मधील आहे आणि तो व्यवसाय निवडताना तुम्ही त्याच्या मागील नेगेटिव गोष्टी शोधल्या आहेत का? याची खात्री करूनच व्यवसाय निवडा. Pmegp Loan Apply 2026

READ NOW – Cmegp loan apply maharashtra 2026

निवडलेला व्यवसाय बाजार पेठेच्या दृष्टीने का चांगला आहे. याचे सविस्तर तुम्हाला काही केस मध्ये बँकेला प्रेजेंटेशन द्याव लागू शकते. त्यामुळे निवडलेल्या व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास झाल्या शिवाय तुम्ही कर्ज प्रकरणाला अर्ज करू नका. जरी तुम्ही अर्ज केला आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही लॉस मध्ये आला आणि वेळेवर रीपेमेंट करू शकला नाही तर तुमचा सिबिल स्कोर डाउन होईल आणि त्यांनंतर तुम्हाला कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणार नाही. आणि जरी कोणती बँक तयार झाली तर त्याचा व्याजदर हा जास्त असू शकतो. Pmegp Loan Apply 2026

केंद्र सरकारने उत्पादन आणि सेवा व्यवसायांसाठी एक योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister Employment Genration Program 2026) या योजनेतून सूक्ष्म व्यवसायांसाठी अनुदान म्हणजेच सबसिडी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून ३५ टक्क्यांपर्यंत सबसिडी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे. आत्ता पर्यंत हजारो तरुणा – तरुणींनी या योजनेतून लाभ मिळविला आहे.

READ NOW – Central Armed Police Force Bharati 2026

योजनेचे मुख्य धोरण – उद्देश

बेरोजगार तरुणांना योजनेतून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर बनविणे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात वाढती बेरोजगारी पाहता, तरुणांच्या हाताला काम मिळावे. आणि जे छोटे व्यवसाय करण्यास इच्छुक आहे त्यांना याचा लाभ देऊन यशस्वी व्यवसायिक बनविणे.

यातील ठरवून दिलेली मुख्य कर्ज मर्यादा –
उत्पादन व्यवसाय – ५० लाख पर्यंत
सेवा व्यवसाय – २० लाख पर्यंत

सबसिडी कोणाला किती प्रमाणात दिली जाते?

Category ग्रामीण शहरी
सर्वसाधारण (Genral Category) २५% १५%
ST/SC/OBC महिला, अपंग मा. सैनिक ३५% २५%

 

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? Pmegp Loan Apply 2026

या योजनेचा लाभ जो बेरोजगार आहे अशे तरुण तरुणी घेऊ शकतात. जर तुमचा जुना व्यवसाय असेल तर तुम्ही या योजनेतून लाभ घेऊ शकत नाही. जर तरी देखील या योजनेचा तुम्ही लाभ घेतला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
या व्यवसायातील शैक्षणिक अट (education) Pmegp Loan Apply 2026
१० लाखाच्या पुढील उत्पादन व्यवसाय ८ वी पास
५ लाखाच्या पुढील सेवा ८ वी पास

५ लाखांच्या आत व्यवसाय असेल तर शिक्षणाची अट नाही.

या योजनेच्या महत्वाच्या अटी आणि नियम

या योजनेच्या अनुदानाचा लाभ आयुष्यात एकदाच घेता येतो, जर यापूर्वी तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमचा अर्ज पडताळणी समितीकडून नामंजूर केला जाऊ शकतो. या योजनेत तुम्ही घेत असलेले कर्ज परत भरण्याचा कालावधी ३ ते ७ वर्षाचा असतो. तुम्हाला मंजूर झालेले अनुदान ३ वर्षांसाठी तुमच्या कर्ज खात्यावर लॉक केले जाते, जर तुम्ही घेतलेले कर्ज व्यवस्थित परतफेड केली नाही तर तुम्हाला अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच अडचणींना समोर जाव लागू शकते किंवा तुम्हाला मिळालेली अनुदान रक्कम गोठवण्यात येऊ शकते.

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया (नीट समजून घ्या) Pmegp Loan Apply 2026

  1. PMEGP पोर्टलवर अर्ज दाखल
  2. जिल्हा खादीग्राम विभागाकडून अर्जाची तपासणी
  3. संबंधित विभागाकडून मंजुरी
  4. बँकेकडून कर्ज मंजुरी
  5. व्यवसायाचे EDP ट्रेनिंग
  6. बॅंकेकडून कर्ज वितरण
  7. अनुदान वितरण
या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रांची यादी
आधार कार्ड – Aadhar Card
पॅनकार्ड – Pancard
पासपोर्ट फोटो – Passport Photo
रहिवासी दाखला – Living Certificate
जात प्रमाणपत्र – Cast Certificate
डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – Daitail Project Report
बँक खात्याचे तपशील – Bank Account Daitails
लोकसंख्या दाखला (ग्रामीण भाग असेल तर) – Population Certificate
या बँकांमध्ये घेता येणार लाभ? Pmegp Eligibal Bank List
Eligibal Bank List Click Now
अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत संकेतस्थळ Pmegp Loan Apply 2026
अर्ज नमुना VIEW NOW
अर्ज करा APPLY NOW
अधिकृत संकेतस्थळ VIEW NOW

READ NOW – Railway Bharati 2026

FAQ – अर्ज करण्यापूर्वी अनेकांना हे प्रश्न वारंवार पडतात.

1. Pmegp ही योजना कोण चालवते?

उत्तर – ही योजना केंद्र सरकारच्या खादी ग्राम उद्योग म्हणजेच KVIB या संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते.

2. तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर स्वतःला किती रक्कम गुंतवावी लागेल?

उत्तर – तुम्ही जर सर्वसाधारण प्रवर्गातून येत असाल तर १०% आणि विशेष प्रवर्गातून येत असाल तर ५% इतकी स्व गुंतवणूक करावी लागणार आहे.

3. जुना व्यवसाय असेल तर लाभ घेता येईल का?

उत्तर – नाही कारण ही योजना फक्त नवीन व्यवसायिकांसाठी आहे.

4. जर बँकेने कर्ज नामंजूर केले तर काय करावे?

उत्तर – तुम्ही यासोबत जोडलेला प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित बनवा. नाहीतर तुम्ही दुसऱ्या बँकेत अर्ज करू शकता.

5. अर्ज केल्यानंतर सर्व मंजुरीसाठी किती दिवस लागतात?

उत्तर – अर्ज केल्यानंतर १ ते ६ महिने कालावधी लागू शकतो. काही जणांची ८ दिवसात पण फाईल मंजूर झाली आहे.

6. सिबिल स्कोर किती हवा आणि तो पाहिला जातो का?

उत्तर – बँक कर्ज मंजूर करताना सिबिल स्कोर पाहते, तुम्हाला या कर्जासाठी ६५० हून अधिक सिबिल स्कोर लागतो.

7. cmegp आणि pmegp मध्ये फरक काय आहे?

उत्तर – pmegp ही योजना केंद्र सरकार कडून राबविली जाते तर cmegp ही योजना राज्य सरकार कडून राबविली जाते.

8. या योजनेच्या अधिकाऱ्यांची विजिट होते का?

उत्तर – काही प्रकरणांमध्ये विजीट होते. तर काही प्रकरणांमध्ये ऑनलाईन प्रोसेस करून घेतली जाते.

9. कर्ज मंजूर झाल्यानंतर ट्रेनिंग किती दिवसांचे असते?

उत्तर – कर्ज मंजूर झाल्यानंतर १२ ते १३ दिवसांचे ट्रेनिंग होते.

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment