Pm Kisan Yojana: पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता पाहिजे असेल तर आत्ताच करा हे काम; अन्यथा कधीच पैसे येणार नाहीत

Pm Kisan Yojana Update | 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सन्मान निधी योजना सुरू केली होती. ही योजना आत्ता पर्यंत योग्य पद्धतीत सुरू आहे. आत्ता पर्यंत या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेचा 13वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही कामे करावी लागणार आहेत.

Join WhatsApp Group

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे 6 हजार रुपये 3 हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. त्यामुळे ही योजना हळू हळू शेतकऱ्यांसाठी आधारवड बनू लागली आहे. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे दिवस गोड झाले आहेत.

मात्र 12व्या हप्त्याचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. आणि काहींच्या जमा झाले आहेत. मात्र आम्ही सांगितलेले काम जर तुम्ही वेळेत पूर्ण केले नाही तर येणारा 13 वां हप्ता देखील तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच हे काम पूर्ण करून घ्यावे.

ज्या शेतकऱ्यांचे EKYC करायचे राहिले असेल त्यांनी येत्या काही दिवसात Ekyc करुन घ्यावी. जर Ekyc केली नाही. तर तुम्हाला याचा पुढील हप्ता मिळणार नाही. तसेच काही शेतकऱ्यांकडून बँकेची माहिती चुकली आहे. त्यामुळे त्यांना मागील 12वा हप्ता मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी मागील बँकेची योग्य माहिती पुन्हा भरावी.

अशी करा EKyc? (How to do ekyc?) –

    • सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये ब्राऊझर ओपन करा.
    • त्यानंतर https://pmkisan.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा.
    • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर Farmer Corner असे एक बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
    • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला E-KYC असे एक बटण दिसेल.
    • त्यानंतर पुढील एक वेगळा टॅब ओपन होईल, त्यावर आधार नंबर व्यवस्थित टाका.
    • तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल. तो त्याठिकाणी भरा.
    • त्यानंतर SUBMITE OTP वर क्लिक करा.
    • हि प्रोसेस केल्यावर तुमची Ekyc पूर्ण होईल.

 

जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन EKYC करु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button