Pm Kisan Yojana 2026: अनेक शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रुपये, २२व्या हप्त्याची महत्वाची अपडेट

February 26, 2026 10:33 PM
Pm Kisan Yojana 2026

Pm Kisan Yojana 2026 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली, या योजनेतून करोडो शेतकऱ्यांना मोठा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. जे अपात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभा पासून वंचित ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेकांना याचा दणका बसला.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा येणारा २२ वा हप्ता होळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २६ नंतर कोणत्याही तारखेला हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बटण दाबून जारी करणार आहेत. मात्र संबंधित हप्त्याची अधिकृत तारीख आणखी शासनाने जाहीर केली नाही. पण १६ नोव्हेंबर रोजी या योजनेचा २१ वा हप्ता जारी करण्यात आला होता. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची होळी गोड होणार आहे.

ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना २२ व्या २ हजार रूपयांच्या हप्त्यासोबत पेंडिंग ला असलेल्या हप्त्याचे धरून ४ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना २१ वा हप्ता मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनी घाबरू नये त्यांचा २२ व्या हप्त्या सोबत पुढील हप्ता देखील जमा होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार होताना पाहायला मिळत आहे.

या येणाऱ्या २२ व्या हप्त्यातून अनेक शेतकऱ्यांची नावे काढण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी टाइमलाइन देऊन देखील त्यांची पंतप्रधान सन्मान निधीसाठी EKyc केली नाही, त्या शेतकऱ्यांना या २२ व्या हप्त्यातून गाळले जाऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी Ekyc केली नसेल अशा शेतकऱ्यांनी तत्काळ Ekyc करणे बंधनकारक आहे. योजनेचे कामकाज पारदर्शक चालावे तसेच योजनेमध्ये जे खरच गरजू शेतकरी आहेत. त्यांनाच लाभ मिळावा म्हणून शासन या योजनेच्या अंतर्गत कायम Ekyc साठी शेतकऱ्यांना आवाहन करत असते.

वाचा – शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; लगेच करा अर्ज

मात्र अनेक शेतकरी वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष करताना शासनाच्या निदर्शनात आले आहे. जर लाभार्थी शेतकऱ्यांची Ekyc झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत एकदाही Ekyc केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून कायमच हटवण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. यामुळे इतर अन्य पेंडिंग शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमचे नाव या यादीत आहे का? ते कसे तपासायचे
सुरुवातीला पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृ वेबसाईट वर जावा. त्यानंतर या योजनेच्या मुख्य पेजवर तुम्ही जाल, त्यानंतर पेजच्या उजव्या बाजूला लाभार्थी यादी असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पर्याय दिसेल त्यानंतर त्या ठिकाणी तुमचे राज्य निवडा, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, आणि शेवटी तुमचे गाव निवडा नंतर त्या ठिकाणी Get Report असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. तुमच्या गावातील पात्र यादी तुमच्या स्क्रीन वर दिसेल.

वाचा – राज्यात ३ लाखांपर्यंत कर्जमाफीची शक्यता; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

यादी तपासण्यासाठी खालील बॉक्स मधील लिंकवर क्लिक करा.

https://pmkisan.gov.in/

पंतप्रधान किसान योजनेसाठी मोबाईल वरून EKYC कशी करावी. (Pm kisan Yojana Online Ekyc)

तुमच्या स्मार्टफोन मध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा, त्यानंतर Pm Kisan चे मोबाईल ऍप तुमच्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर डाउनलोड केलेले ऍप ओपन करा, ऍप ने मागितलेल्या सर्व परमिशन Allow करा. परमिशन Allow केल्यानंतर तुम्ही ऍप मध्ये मुख्य पेजवर जाल. नंतर त्याठिकाणी किसान कॉर्नर शोधा आणि त्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-केवायची असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्यानंतर तुमच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीला दिलेला लिंक मोबाईल नंबर टाका. OTP येईल तो व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर त्या ठिकाणी लाभार्थी स्थिती असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यांनंतर तुमच्या आधार कार्ड शी जो मोबाईल नंबर सलग्न आहे, त्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर पुढील २४ तासात तुमची Ekyc अपडेट होईल.

Ekyc अपडेट झाली की नाही ते कसे पहायचे?
पीएम किसान सन्मान निधीच्या मुख्य वेबसाईट वर जावा. त्यानंतर फार्मर कॉर्नर ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लाभार्थी स्थिती असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार किंवा मोबाईल नंबर टाकून घ्या. ओटीपी येईल तो व्यवस्थित भरून घ्या. Get Data या ऑप्शन वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर Ekyc Status दिसेल, त्याठिकाणी Yes किंवा No असे सांगितले जाईल. Yes असेल तर तुमची Ekyc पूर्ण झाली आहे.

वाचा  – बापरे! पंतप्रधान आवास योजना मोठी अपडेट, शासनाने नवीन नियमावली केली जाहीर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती
ज्या शेतकऱ्यांना वरील माहिती समजली नाही, किंवा वेबसाईट वर जाऊन काही गोष्टी करता येत नाहीत. अशा शेतकऱ्यांनी तुमच्या जवळच्या महा इ सेवा केंद्जाऊन Ekyc किंवा लाभार्थी यादी तपासून यावी.

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment