Pm Awas Yojana Update 2026 | गरजू आणि गरीब नागरिकांना राहण्यासाठी निवारा म्हणजे हक्काच घर बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडून पंतप्रधान आवास योजना चालविली जाते. या योजनेच्या माध्यमातून हजारो गरजू लोकांना हक्काचे घर मिळाले आहे. हक्काचे घर मिळाल्याने अनेक गरजूंनी या योजनेचे आभार मानले आहेत. शासनाने सुरू केलेल्या ही योजना आता गावा खेड्यातील गरजूंना देखील लाभ मिळवून देत आहे. (Pm Awas Yojana Apply 2026)
मात्र शासनाच्या या योजनेत काही अपरिहार्य गोष्टी घडलेल्या शासनाच्या नजरेत येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शासन वेळोवेळी या योजनेच्या नियमात काही बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही योजना गरजू लोकांसाठी शासनाने सुरू केली आहे. मात्र याचा लाभ गरजू लोकांना मिळत नाही. अनेकजण या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले आहे. Pradhan Mantri Awas Yojana online application
म्हणून शासनाने या योजनेतील अशे काही नियम बदलले आहेत. ते आज आपण या लेखनाच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्याची तयारी करत असाल किंवा ज्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत मात्र अद्याप पर्यंत त्यांना पात्र यादीत घेण्यात आले नाही. अशा लोकांनी शासनाने बदल केलेल्या नियमाचा तोटा आणि फायदा होऊ शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकजण बोगस कागदपत्र तसेच इतर गोष्टी बोगस करून योजनेचा लाभ मिळवत आहेत. २ लाख ५० हजार अनुदानासाठी काही लोकांनी तर नवीन जागा घेतल्या आहेत. आणि त्या जागेत या अनुदानातून घर बांधले जात होते. मात्र ही गोष्ट शासनाच्या निदर्शनात आली आणि यातील महत्वाचा नियम शासनाने बदलला आहे.
जर तुम्ही ३१ ऑगस्ट २०२४ नंतर जमीन खरेदी केली असेल तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक जण जागा खरेदी करण्यासाठी धावपळ करत आहेत. त्यामुळे या मोठ्या नियमाचा बदल शासनाने केला आहे. ३१ ऑगस्ट पूर्वी जर तुम्ही जागा खरेदी केली असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. PMAY application process
मात्र जागा या तारखेच्या नंतर खरेदी केली असेल तर तुम्हाला यातून अपात्र ठरविले जाणार आहे. यासोबतच तुमच्याकडे ही जागा ३१ ऑगस्ट पूर्वी असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यासाठी राहत्या घराचे घरपट्टी, पाणी पट्टी, विज बिल, त्या ठिकाणी मतदान करत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
याची पूर्तता केल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभार्थी बनू शकता. तुम्ही जर या कागदपत्रांची पूर्तता वेळेत केली नाही तर तुमचा अर्ज नामंजूर केला जाऊ शकतो. तसेच यासोबतच तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधकाम करणार आहात ही जागा रेसिडेंट असायला हवी. जर तुम्ही इंडस्ट्रियल किंवा शेत जमिनीवर या योजनेतून लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा अर्ज नामंजूर केला जाईल.
हा नियम प्रधानमंत्री आवास योजना २.० शहरी साठी लावण्यात आला आहे. यामुळे खऱ्या गरजूला भक्कम घर मिळणार आणि जे ट्रिक वापरून या घराचा लाभ घेत होते. अशांना चपराक शासनाकडून मिळाली आहे. अनेक गरजू लोकांनी या योजनेसाठी परिपूर्ण अर्ज भरावा असे आवाहन देखील शासनाकडून करण्यात येत आहे.
यामुळे काय होणार? Pm Awas Yojana Update 2026
यामुळे या योजनेमध्ये गैरफायदा घेणाऱ्या लोकांना आळा बसणार आहे. गरजू गरीब म्हणजे ज्याला खरच या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे अशा लोकांना आळा बसण्यासाठी शासनाने या नियमात बदल केले आहेत. मात्र तुम्ही जर या योजनेसाठी खरोखर पात्र असाल तर तुम्ही वरील नियमाच्या आधारे अर्ज करू शकता. त्याच प्रमाणे योजनेत कोणी पैसे घेताना तुम्हाला आढळले तर तुम्ही संबंधित योजनेच्या कार्यालयात त्याची तक्रार करू शकता. हे केल्याने योजनेतील होणारा भ्रष्टाचार थांबेलच पण मूळ गरजूला मदत मिळेल.
या योजनेसाठी तुमची तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता. फक्त अर्ज करताना सर्व कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करा. कारण तुम्ही जर अपूर्ण कागदपत्रांच्या सहाय्याने अर्ज केला तर तुमच्या अर्जाला अडचणी येऊ शकतात. आणि या अडचणींमुळे तुमचे नाव यादित यायचे राहू शकते. त्यामुळे तुम्ही सविस्तर अर्ज सादर करा. आणि याचा तुमच्या नगर पालिकेत जाऊन पाठपुरावा करत रहा. PM Awas Yojana required documents
या योजनेची संपूर्ण माहिती?
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली. १ एप्रिल २०१६ रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच २०२४ मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा लाभ मिळावा हे शासनाचे मुख्य धोरण आहे. शासनाने ठरविलेल्या नियम आणि अटींच्या अधीन राहून नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर अनैतिक रित्या या योजनेचा कोणी लाभ घेतला असेल तर त्याला दंडात्मक कारवाई ला समोर जावं लागू शकते.
हे टाळा नाहीतर होईल फसवणूक
तुम्ही पंतप्रधान आवास योजनेला अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही फ्रॉड कॉल येतील. सांगितले जाईल की मी योजनेच्या कार्यालयातून बोलतोय मला व्हेरिफिकेशन साठी एक otp हवा आहे. तर सदर otp तुम्ही देऊ नका. तुम्ही थेट कार्यालयात जाऊन चौकशी करा. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. तुमच्या बँक खात्यात असलेली रक्कम सायबर चोर चोरू शकतात. त्यामुळे तुम्ही सतर्क रहा.





