सोलापूरचा प्लंबर झाला प्रसिद्ध युट्युबर; महिन्याला कमावतो तब्बल एवढे लाख रुपये

सोलापूर | नशीब कधी पालटेल याचा काही नेम नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला गुण असतात. गरज असते ती फक्त हे कलागुण शोधून त्यांच्यावरती काम करण्याची. मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक व्यक्ती सामान्य आयुष्य जगत असतात. तर काही व्यक्ती अपार कष्ट करून दोन वेळेचं जेवण मिळवत असतात. असंच काहीसं प्रकार एका प्लंबर बरोबर घडला.
गणेश नावाचा एक मुलगा आपल्या सोलापूर गावामध्ये प्लंबर च काम करत होता. बीए भाग 2 पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि कामाकडे लक्ष दिल. गावातील सर्व ठिकाणी तो प्लंबर चे काम करत होता.
ई-मेल आणि इंटरनेटच्या विश्वापासून बराचसा दूर असलेला गणेश आज हातात फोन आणि ट्रायपॉड घेऊन दरमहा एक लाख रुपये कमवत आहे. प्लंबरचे काम करून पोट भरत नव्हते. त्यावेळी त्याची नजर टिक टॉक या ॲपवर पडली. टिक टॉकचे व्हिडिओ पाहून आपणही अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू शकतो असे त्याला. त्यानंतर लगेचच त्याने हातातला पान्हा आणि नळ बाजूला ठेवत हातात फोन आणि ट्रायपॉड घेतला.
यावरती सुरुवातीला तो गावरान भाषेतील कॉमेडी व्हिडिओ बनवू लागला. पाहता पाहता त्याच्या या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत होती. मात्र भारत सरकारने चिनी ॲपवर बंदी आणली त्यामुळे त्याला देखील येथून माघार घ्यावी लागली. अशात टिक टॉक बंद झाले असल्याने त्याने युट्युबकडे आपला मोर्चा वळवला.
यावरती तो आपली पत्नी बरोबर व्हिडिओ बनवू लागला. गणेशच्या पत्नीचे नाव योगिता असे आहे. तसेच त्यांना एक छोटीशी मुलगी देखील आहे. मुलीचे नाव शिवानी असून ती तीन वर्षांच्या आहे. त्यांच्या व्हिडिओतील कंटेंटमध्ये आकर्षणाचा भाग म्हणजे ते करत असलेली कॉमेडी आणि त्यांची छोटीशी मुलगी आहे. त्यांच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने त्यांच्या गावाकडील भाषेचा उपयोग केला जातो.
त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग वाढला आहे. “गणेश शिंदे मोहळ” असं त्याच्या यूट्यूब चॅनलच नाव आहे. 23 मे 2019 रोजी त्याने हे चॅनल सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी आपल्या मुलीबरोबर जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्याला आता जवळजवळ 5 कोटींहून अधिक व्यूव्ज मिळाले आहेत. 8 लाख 65 हजार एवढे त्याचे सबस्क्रायबर आहेत. तसेच तो यातून दरमहा 1 लाख रुपये कमावतो.