पट्ट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार…, रडता रडता प्रशांत दामले यांनी प्रदीप पटवर्धन यांना दिला अखेरचा निरोप
मुंबई | प्रदीप पटवर्धन यांच्या दमदार अभिनयाने काल संपूर्ण महाराष्ट्र दुखात विलीन झाला होता. अचानक प्रदीप पटवर्धन यांनी या जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. अनेकांनी यावेळी सोशल मीडिया मार्फत आपले दुःख व्यक्त केले. प्रदीप पटवर्धन यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमधून पूर्ण केले. या कॉलेजात त्यांच्याबरोबर अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकार शिकले आहेत. त्यातीलच एक म्हणजे प्रशांत दामले.
आपल्या मित्राच्या निधनामुळे प्रशांत दामले फार खचून गेले आहेत. आपली मैत्री सोडून तू पुढे निघून गेलास… असे ते म्हणत आहेत. प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावरती दुःख व्यक्त करत एक दुःखद पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच यामधून या दोन्ही कलाकारांच्या मैत्रीची जाणीव होत आहे. प्रशांत दामले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” पट्या… प्रदीप पटवर्धन… मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या…”
प्रशांत दामले हे प्रदीप यांना पट्या म्हणून हाक मारायचे. या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, ” सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालु राहणार.
मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे.”
पुढे त्यांनी आपल्या मित्राला आस्वांनी भरलेल्या डोळ्यांनी निरोप देताना म्हटले, “पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार” प्रशांत दामले यांच्या या पोस्टमुळे चाहते आणखीनच दुःखी झाले आहेत. या दोघांची मैत्री प्रदीप पटवर्धन तोडून पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे प्रशांत दामले खूप दुःखी आहेत. प्रदीप पटवर्धन यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला मोठे योगदान दिले होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक नाटके आणि चित्रपटांमध्ये काम केले.
नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील त्यांनी साकारलेली भूमिका खूप गाजवली होती. या चित्रपटाबरोबरच त्यांनी १२३४ या चित्रपटात देखील काम केले. प्रदीप पटवर्धन यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अभिनय केला होता. त्यांची विनोदी भूमिका देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत होती. मोरूची मावशी हे त्यांचे नाटक खूप गाजले होते. या नाटकातूनच ते घराघरात पोहोचले.