परेश रावल यांची पत्नी दिसते खूप सुंदर; करतेय ‘हे’ काम

मुंबई | परेश रावल बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या आणि विनोदी भूमिकेत दिसलेत. परंतु वास्तविक जीवनात ते खूप रोमँटिक आहेत आणि त्यांची प्रेमकथा कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नाही. परेश रावल यांच्या पत्नी दिसायला खूप सुंदर आहेत. पहिल्याच नजरेत परेश स्वरूप संपत यांना आपले हृदय देऊन बसले होते.
मात्र प्रपोज केल्यावर वर्षभर हे दोघे एकमेकांशी बोलले नव्हते. आता अस कोण करत पण परेश यांनी असच केलं होतं. याचा खुलासा स्वतः त्यांचा पत्नीने एका मुलाखतीत केला आहे. स्वरूप संपतला परेश यांना एका मुलाखतीत मुका म्हटल्या होत्या. या दोघांनी तब्बल १२ वर्षे एकमेकांची वाट पाहिली आणि १९८७ मध्ये लग्न केले. दोघांना आदित्य आणि अनिरुद्ध ही दोन मुले आहेत.
साल २०२१ मध्ये परेश यांनी एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कहाणी सांगीतली होती. परेश बॉलीवूडमध्ये येण्या आधी ज्या कंपनीत काम करत होते तिथल्या बॉसची मुलगी त्यांना आवडली होती. स्वरूप संपत त्यांच्या बॉसची मुलगी होत्या. आता त्यावेळी बॉसची मुलगी म्हटल्यावर मित्रांना त्यांनी या विषयी सांगितले.
महेंद्र जोशी अस त्यांच्या मित्राच नाव होतं. मुलाखतीत परेश म्हणाले की, ” मी महेंद्रला हे सांगितले तेव्हा तो मला म्हणाला, बाबा ती आपल्या बॉसची मुलगी आहे. तू अजून विचार कर. त्यावेळी मी त्याला म्हणालो की, बॉस मुलगी असो, किंवा इतर कुणाची बहिण किंवा आई मी तिच्याशीच लग्न करणार.”
स्वरूप संपत यांच्या विषयी सांगायचं झाल्यास त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५८ रोजी झाला. त्यांचे वडील थिएटर आर्टिस्ट होते आणि आई डॉक्टर होत्या. स्वरूप यांना लहान पणा पासूनच चित्रपटांची आवड होती. यामुळेच अभ्यासात त्यांचे फारसे काही लक्ष नव्हते.
परेश रावल आणि स्वरूप यांची पहिली भेट थिएटरमध्येच झाली होती. स्वरूप त्या काळात खूप सुंदर होत्या. स्वरूप संपत यांनी १९७८ मध्ये मिस इंडिया झाल्या आणि त्याच वर्षी त्यांनी मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी लंडनमधून पीएचडी देखील केली आहे.
त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचा नखुद या चित्रपटातून स्वरूप यांना पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटात त्यांच्या बरोबर रजनीकांत यांनी स्क्रीन शेअर केली होती. प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘नराम गरम’ या चित्रपटात स्वरूप यांना मुख्य नायिका म्हणून कास्ट करण्यात आले. ये जो है जिंदगी, दुनिया गजब की, शांती अशा मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.