आत्ताच्या घडामोडी

मुलाच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी जमीन आणि दागिने विकले; मुलाने थेट UPSC मध्येच यश मिळविले

मुंबई | जिद्दीने आणि चिकाटीने घेतलेली मेहनत ही नेहमीच आपल्याला यशस्वी होण्यासाठी भाग भाग पाडते. खरं तर आपली मेहनत अपार असेल तर सर्व अडचणी कोलमडून पडतात याचीच प्रचिती करमाळा तालुक्यात एका शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पांढूरंग गोरख चोरमले यांच्या यशातून होत आहे. अथक परिश्रम घेत त्यांनी पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. आता ते भारतीय डाकसेवा अधिकारी (IPOS) पदी विराजमान झाले आहेत.

 

पांढूरंग यांच्या घरची परिस्थिती फार हालाखीची होती. गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर त्यांचे घर होते. गावात शालेय शिक्षण घेतले. मात्र हे शिक्षण त्यांनी उघड्यावर आसलेल्या शाळेत पूर्ण केले. त्यांचे आई वडील दोघेही अशिक्षित आहेत. मात्र त्यांना शिक्षण आणि त्याचे महत्व चांगलेच माहीत होते.

 

त्यामुळे त्यांनी पांढूरंग यांना नेहमीच अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. लहापणा पासूनच अभ्यासात हुशार असल्याने नेहमीच त्यांचे कौतुक व्हायचे. दहावीची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना १२ पर्यंतच्या शिक्षणासाठी बारामतीला जावे लागले. इथे प्रवेश घेतना लागणारी फी भरण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी खूप कष्ट केले. या काळात पांढूरंग यांनी देखील जनावरे राखणे, दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणे ही कामे केली.

 

त्यांच्याकडे स्वतःची काही जनावरे होती आणि थोडीशी जमीन देखील होती. त्यामुळे ते अभ्यास करत आपल्या आई वडिलांना या कामात देखील मदत करत होते. कसे बसे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. नंतर पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले. मात्र घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी थोडी जमीन आणि आईने तिचे दागिने विकून शिक्षणासाठी पैसा उभा केला.

 

पांढूरंग यांनी पदवीचे शिक्षण खूप हाल सोसत पूर्ण केले. त्यानंतर लगेचच त्यांना एका बड्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यांचे लग्न देखील झाले. सर्व दारिद्र्य आता हळू हळू संपू लागले होते. त्याचं वेळी त्यांना UPSC परीक्षा बद्दल समजले. आपण तर हुशार आहोत त्यामुळे आपण देखील ही परीक्षा देऊन अधिकारी होऊ शकतो असे त्यांना वाटले.

 

त्यामुळे त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि upsc अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी कोणताही क्लास न लावता स्वतः या परीक्षेचा अभ्यास केला. यावेळी त्यांना त्यांच्या घरच्यांनी खूप साथ दिली. तसेच मित्रांनी देखील मार्गदर्शन केले. या परीक्षेच्या अभ्यासासाठी नंतर त्यांनी दिल्ली गाठली.

 

यावेळी त्यांचे पाहिले चार प्रयत्न फासले. तेव्हा अनेक व्यक्ती त्यांना टोमणे मारत म्हणत होत्या की, हातात असलेली नोकरी सोडली आणि आता पुन्हा दारिद्र्यात गेला. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि पाचव्या प्रयत्नात त्यांनी घवघवीत यशाला गवसणी घातली. यावेळी त्यांचे वय ३२ झाले होते. आता ते भारतीय डाकसेवा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button