आत्ताच्या घडामोडी

पेपर विकणारा मुलगा झाला IAS; मजुरी करून सोडवली UPSC

दिल्ली | आजवर तुम्ही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या अनेक संघर्षमय कहाण्या ऐकल्या असतील. अधिकारी होण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र काहीच व्यक्ती हे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करू शकतात. कारण त्यांच्याकडे परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकत खूप असते. त्यांना फक्त स्वतः साठी नाही तर या देशाच्या सेवेसाठी UPSC परीक्षा उत्तीर्ण करायची असते. आज आपण उधार पुस्तके घेऊन आणि पेपर विकून आयएएस अधिकारी झालेल्या निरिश यांची कहाणी जाणून घेणार आहोत.

 

निरिश यांनी काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील सांगितलेला संघर्ष ऐकून तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील. निरिश राजपूत यांच्या आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष केला आहे. घरची हालाखीची परिस्थिती आल्याने त्यांना अभ्यासासाठी दुसऱ्या मित्राकडून पुस्तके उधारीने घ्यावी लागत होती. मात्र आज ते एक आयएएस अधिकारी आहेत.

 

निरिश राजपूत हे मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील एक टेलर होते. त्यांच्या परिवारात आई बाबा आणि तीन भावंडे होती. हे सर्व जण १५ बाय ४० च्या एका छोट्या घरात रहात होते. वडील टेलर असल्याने घरची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. मात्र निरिश लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण घरा जवळ असलेल्या शासकीय विद्यालयातून पूर्ण केले.

 

घरी कुटुंब मोठे आणि करता पुरुष एकच असल्याने त्यांना चांगल्या शाळेत शिक्षणासाठी पैसे नव्हते. तसेच शासकीय विद्यालयात देखील त्यांना थोडी फी भरावी लागत होती. मात्र त्याच्याकडे तेव्हढे पैसे देखील नसायचे. त्यामुळे त्यांनी आपली फी भरण्यासाठी पेपर विकायला सुरुवात केली. पेपर विकून ते वडिलांना शिलाई कामात मदत करत होते.

 

अशा पद्धतीने १० पर्यंत शिक्षण पूर्ण करून १० वीमध्ये त्यांनी ७२ टक्के मिळवले. त्यानंतर त्यांनी ग्वालियर येथील शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी बीएससी आणि एमएससीचे शिक्षण पूर्ण केले. मुलाखतीत त्यांनी सांगितले की, शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक ठिकाणी पार्ट टाइम जॉब केला.

 

पुढे आपल्या UPSC परीक्षेच्या काळातील संघर्षाविषयी सांगताना ते म्हणाले की, ” पार्ट टाईम जॉब करतानाच मी UPSC चा अभ्यास सुरू केला होता. काही दिवसांनी माझ्या एका मित्राने उत्तराखंड येथे एक कोजिंग क्लास सुरू केला. त्याने मला तिथे जॉब ऑफर दिली. यावेळी मी त्याला सांगितले की, क्लासमध्ये नफा मिळाल्यावर तू मला UPSC परीक्षेच्या पुस्तकांची मदत करशील तरच मी इथे शिकवेल. “मात्र यावेळी त्यांच्या मित्राने त्यांचा विश्वासघात केला. जेव्हा क्लास चांगला चालू लागला, नफा होऊ लागला तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांना नोकरीवरून काढून टाकले. यावेळी निरिश खूप खचले होते.

 

त्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली. तिथे त्यांची एका मुला बरोबर मैत्री झाली. तो मुलगा देखील आयएएसच्या परीक्षेची तयारी करत होता. त्यांनी या मित्राबरोबर अभ्यास सुरू केला. यावेळी ते १८ तास अभ्यास करायचे. नोकरी सुटल्यामुळे निरिश यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या मित्राकडून काही पुस्तके उधार घेऊन अभ्यास केला. असे करत त्यांनी साल २०१३ मध्ये UPSC परीक्षा पास करत ३७० वा रँक मिळवला. आता ते आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button