पप्पा आम्हाला जेवायला बाहेर घेऊन जावा, चिमुकलीचा तो व्हिडिओ व्हायरल; वाचा नेमकी कोण आहे ती?

मुंबई | लहान मुलं म्हणजे एक कोरी पाटी असते. या पाटीवर तुम्ही लिहाल तेच दिसते. अशात सोशल मीडियावर अनेक लहान मुलांचे अतरंगी व्हिडीओ समोर येत अतात. जे पाहून अनेकांना त्याच कौतुकही वाटत तर अनेक जणांना हसू आवरत नाही. अशात सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Join WhatsApp Group

 

बाहेर जावं, मस्त फिरावं आणि बाहेरच खावं अस प्रत्येकाला वाटत असतं. असच या चिमुकलीला देखील वाटत. मात्र तिचे बाबा तिला बाहेर काही खायला घेऊन जात नाहीत. त्यामुळे ती तिच्या मामा कडे वडिलांची तक्रार करते आहे. तिचा हा तक्रारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच अनेक नेटकरी यावे वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

 

चिमुकलीचे बोबडे बोल ऐकून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. ती म्हणते की, ” खोटं बोलून पप्पा बाहेर खायला जातात. आणि मला घेऊन जात नाहीत. मला पण जावं वागत. हे बरोबर आहे का मामा सांगा तुम्ही.” असं सर्व ती तिच्या बोबड्या आणि गावाकडील बोली भाषेत म्हणत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून एवढ्या चिमुकलीला एवढं बोलन सुचलं कसं असा विचार करत आहेत.

 

अनेकजण कमेंट करत लिहीत आहेत की, ” घरात राज्य करणारी एक तरी अशी गोड मुलगी पाहिजे कि ति तिच्या वडिलांना मार्ग दाखवेल” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, ” बिनधास्त बोलण ते पण तोंडावर, ” खूप छान आहे पिल्लू खूप निरागस पप्पा तिला मध्ये मध्ये बाहेर खायला घेऊन जात जा चिडचिड नाही रडणं नाही फक्त मनाची खंत व्यक्त केली आहे पोरींन निरागसपणे” असं म्हणत अनेक जण तिची समजूत काढत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button