आत्ताच्या घडामोडी

दबंग मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न; फोटो शेअर करत म्हणाली….

पुणे | गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांचे लग्न होताना पाहायला मिळत आहे. नुकतेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा दा आणि अंजली बाईने लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे चाहत्यांना एक धक्का बसला होता.

 

याच प्रकारे आगामी काळात रिलीज होणाऱ्या बहुचर्चित चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीने देखील लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. सदर अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना Good News दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

दबंग गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली पिएसआय पल्लवी जाधव ने लग्नगाठ बांधली आहे. पल्लवी ने कुलदीप यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने लग्नासंधर्भातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

त्यानंतर सोमवारी तिने थेट लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पल्लवी सध्या पीएसआय या पदावर कार्यरत आहे. ती आगामी काळात प्रसिध्द होणाऱ्या हैद्राबाद कस्टडी या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे.

 

पल्लवी ला लहान पणापासून अभिनेत्री व्हायचे होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे ती अभिनेत्री होऊ शकली नाही. तिने पदवीधर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा सोडविली आहे. आणि पीएसआय पदावर कार्यरत झाली आहे.

 

तिचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत फॉलोवर्स आहेत. तिच्याकडे मॉडेलिंग क्षेत्रातील किताब असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ती मुळची औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील असल्याची माहिती देखील मिळत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button