पाकिस्तानचा कर्णधार बदलणार, या खेळाडूला दिली जाणार संघाची सूत्रे

मेलबर्न | पाकिस्तान संघाच्या गळाला लागलेला मासा निसटलेला आहे. 1992 साली मेलबर्नमध्ये पाकिस्तान संघान इंग्लंडला पराभवाच्या गर्तेत ढकलल होतं. परंतु या 30 वर्षात पुन्हा एकदा पाकिस्तान संघाला त्या संधीच पुनरागमन करण्यासाठी संधी मिळाली होती. परंतु पाकिस्तान संघ 2022 च्या विश्वचषकात बाहेर फेकला गेला. यासाठी आता पाकिस्तान क्रिकेट असोसिएनने संघाचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावर्षी पाकिस्तान संघान अंतिम सामन्यात प्रवेश केला असला तरीही त्याआधी भारत आणि झिंब्वांबे विरुद्ध ते पराभूत झाले होते. त्यानंतर लगातार 3 सामने जिंकल्याने त्यांना अंतिम सामन्यात संधी मिळाली. मात्र अंतिम सामन्यात त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही.
पाकिस्तान संघाचा बदलला जाणार कर्णधार – बाबर आझम याला कर्णधार पदावरून पायउतार कराव लागणार असल्याचं म्हटलं जातंय. बाबर आझम अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. बाबरने फलंदाजी तसेच तो चांगल्या फॉर्म मध्ये देखील दिसला नाही. त्यामुळे त्याला काढून दुसऱ्याला संधी दिली जाऊ शकते.
पाकिस्तानातील एका पत्रकाराने मोहम्मद रिझवान, शादाब खान, शहीन आफ्रिदी, मोहम्मद हारिस यांची छायाचित्रे ट्विट करत प्रश्न विचारला आहे की पाकिस्तानचा भावी कर्णधार कोण असावा? अशावेळी आमिरने शादाबला पाकिस्तानचा कर्णधार म्हणून निवडलं आहे. तो संघाचा पाच वर्षांपासून सदस्य आणि सध्याचा तो उपकर्णधार आहे. त्यामुळे येत्या काळात त्याला कर्णधार केले जाऊ शकते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.