आत्ताच्या घडामोडीक्रिकेट

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर मोठया अडचणीत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

दिल्ली | पाकिस्तानच्या एका माजी गोलंदाजाविषयी चिंताजनक बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या एका मोठ्या सर्जरीमधून बाहेर पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला गुडघ्यांचा मोठा त्रास होत होता. आता त्याच्या याच आजारांवरती सर्जरी करण्यात आली आहे.

 

सर्जरी झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्याने हा भाऊक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, ” माझी शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे.”

 

या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर भाऊक झालेला दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये त्याने जो व्हिडिओ काढला आहे त्यामध्ये तो म्हणत आहे की, ” गेल्या पाच सहा तासांपासून माझ्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मात्र मी अडचणींमध्ये आहे. मला खूप त्रास होत आहे. रिटायरमेंट घेऊन सुद्धा माझा हा त्रास कमी झालेला नाही. मला अजून चार ते पाच वर्षे खेळायचे होते.

 

मात्र माझ्या गुडघ्यांमुळे मला खेळता आले नाही. मला असे वाटले की मी लवकरच व्हीलचेअर वर येणार आहे. निवृत्तीच्या अकरा वर्षांनंतरही माझा हा त्रास कायम आहे. मी आता क्रिकेटमध्ये नसलो तरी पाकिस्तानसाठी खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती आणि आहे. मला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली तर मी पुन्हा एकदा ते करेल.” असं त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

 

व्हिडिओमध्ये बोलत असताना त्याला होणाऱ्या वेदना त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होत्या. तसेच हॉस्पिटलमध्ये तो एका बेड वरती बसलेला होता. त्याच्या दोन्ही पायांना प्लास्टर केलेले होते. त्याने 224 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान कडून प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याच्या नावावर आतापर्यंत 444 विकेट आल्यात. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून त्याला आजही ओळखले जाते. साल 2002 मध्ये 16.13 किमी प्रति तास वेगाने त्याने न्यूझीलंड विरुद्ध दमदार गोलंदाजी करून सामना जिंकला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button