धुनी भांडी करून परिस्थितीवर केली मात; वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत झाल्या आयएएस अधिकारी, वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अंगी मेहनत आणि चिकाटी असेल तर ती गोष्ट शेवटी आपल्याला मिळतेच. अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात मोठा संघर्ष करून यश संपादन करत असतात. अशात काहींचा संघर्ष एवढा मोठा असतो की, काळजात धडकी भरते आणि डोळे पाणवतात. असाच संघर्षाचा लढा एका आयपीएस अधिकारी महिलेने देखील दिला आहे.

 

त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींवर मात करत यश गाठले आहे. अशात त्यांचं धेय्य मात्र निश्चित होतं. ज्यासाठी त्यांनी आहोरात्र मेहनत केली. इल्मा अफरोज अस या अधिकारी महीलेच नाव आहे. इल्मा १४ वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

Advertisement

 

त्यामुळे आयुष्यातील मोठा आधार निघून गेला. यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती देखील खूप बिकट होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हते. पैशांची खूप ओढाताण होत होती. त्यामुळे अनेक नातेवाईकांनी त्यांना शिक्षण सोडून आईला कामात मदत करण्याचा सल्ला दिला.

Advertisement

 

मात्र इल्मा या अभ्यासात लहानणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी शिकून खूप मोठ व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्या साठी त्यांची आई अधिक मेहनत घेण्यास देखील तयार होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला पुढे शिकवले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर इल्मा यांनी पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवली. त्यानंतर त्यांनी परदेश गाठलं.

 

परदेशात त्यांनी त्यांचे उर्वरित शिक्षण पूर्ण केले. स्कॉलरशिपमुळे शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज नव्हती. मात्र परदेशात राहायचं म्हटल्यावर जवळ थोडा पैसा असणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी तिथे इतर लोकांची भांडी देखील घडली. अशा परिस्थितीत त्यांनी परदेशी शिक्षण पूर्ण केले.

 

परदेशी नंतर त्यांना एक नोकरी देखील मिळाली. असलेली गरिबी आता संपली होती. मात्र त्यांना आपल्या माय देशी परत येऊन देशाची सेवा करायची होती. त्यामुळे त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढे UPSC अभ्यासाची तयारी देखील केली. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आज त्या आयएएस अधिकारी झाल्या आहेत. तसेच आता त्यांनी आपल्या देशातील प्रत्येक गरीब मुलाला शिक्षण देण्याचा निर्धार घेतला आहे. त्यांचा हा संघर्ष अनेकणासाठी प्रेरणादायी आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *