Onion Rate 24 February | नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आजचे ताजे कांद्याचे दर पाहणार आहोत. काही काळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणणाऱ्या कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवले आहे. नोव्हेंबर २०२५ पासून उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला कोणत्याच बाजार पेठेत चांगले दर मिळाले नाहीत. यामुळे शेतकरी राजा चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्यासाठी केलेला खर्च पाहता. त्यातून पाहिजे असा नफा शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे बरेच शेतकरी नैराशात गेलेले पाहायला मिळाले. (maharashtra kanda bajar bhav)
राज्यातील बऱ्याच मोठ्या बाजार पेठेत कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा पिकांवर शेतकऱ्यांनी केलेला खर्च तर निघत नाही. त्यामुळे शेतकरी कांदा लागवड कमी प्रमाणात करताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये याच कांद्याने शेतकऱ्यांची दिवाळी केली होती. मात्र आता दिवसेंदिवस कांद्याच्या दरात ढासळन पाहायला मिळत आहे. उत्पादक शेतकरी वर्गाकडे कांदा सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या रब्बी हंगामातील कांदा भाव साथ देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र त्यांच्या हातात नैराश्य पडले आहे.
जे कांदा उत्पादक मोठे शेतकरी आहेत त्यांनी कांद्याच्या निगराणीसाठी कांदा चाळ व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे जरी कांद्याचे दर पडले तरी त्याची साठवण क्षमता संबंधित शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. मात्र छोट्या शेतकऱ्यांना शेतातील काढलेला कांदा तात्काळ बाजार पेठेत घेऊन जाण्या पलीकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना कांद्यामुळे अनेक कठीण परिस्थितीला समोर जावं लागत आहेत. आज देखील महाराष्ट्रातील अनेक बाजार पेठेत कालच्या आणि परवाच्या तुलनेत बाजार भावात मंदी पाहायला मिळाली. (kanda zaleli avak today)
आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव – 24/02/2026 (Onion Rate 24 February)
आजचे राज्यातील कांद्याचे सरासरी दर हे १ हजार रुपयांपासून ते १ हजार ५०० रुपयांपर्यंत आहेत. महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेत म्हणजेच लासलगाव मध्ये १ हजार रुपयांपासून ते १३०५ रुपयांपर्यंत कांद्याची विक्री झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील काही बाजार महत्त्वाच्या बाजार पेठेत उच्च प्रतीच्या कांद्याला २५०० रुपयांपर्यंत आज दर मिळाला आहे. राज्यातील १०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. कालच्या दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळत आहे. (kanda latest bajar bhav maharashtra)
एक नजर २३ फेब्रुवारीच्या दरावर टाकू
२३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील बाजार पेठांमध्ये कांद्याची मोठी आवक पाहायला मिळाली. यामध्ये एकट्या नाशिकने महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक केला. २३ तारखेला नाशिक कांदा बाजार पेठेत ३ लाख ३६ हजार क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे या दिवशी कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. वाढत्या आवकेमुळे कांद्याच्या दरात घसरण होते. (kanda darpatrak 2026)
राज्यात कालच्या दिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी सरासरी ५०० पासून ११०० रुपयांपर्यंत दर पाहायला मिळाले. काही बाजार पेठांमध्ये हे दर वाढले होते. उच्च प्रतीच्या कांद्याला २२ रुपयांपर्यंत दर मिळाल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांजवळील कांदा साठवण संपल्या नंतर कांद्याच्या दराला चांगले भाव मिळतील असे कृषी अभ्यास सांगत आहेत. (kanada bajar bhav india)
महाराष्ट्र अपडेट वर कांदा आणि इतर पिकांचे जे दर टाकले जातात, ते संबंधित बाजार पेठेत फोन करून दूरध्वनी वर माहिती घेतलेले दर असतात. तेथील व्यापारी वर्गांकडून हे दर घेतले जातात. तसेच तेथील काही संपर्कातील कांदा शेतकऱ्यांकडून दराची मागणी करून आम्ही तुम्हाला दररोज दर माहिती पुरवितो. संबंधित दर हे बाजार समितीने ठरविलेले असतात. तुम्हाला कांदा, सोयाबीन तसेच इतर भाजी मंडईतील दर आणि सोने चांदी दर, पेट्रोल डिझेल दैनंदिन दर, सरकारी शेतकरी योजनांची माहिती. राज्यातील देशातील सरकारी नोकरी विषयक माहिती हवी असेल तर आज आमच्या सर्व सोशल मीडिया हॅण्डल ला तुम्ही फॉलो करा. आमच्या रोज नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील.





