अभिनेते राज बब्बर यांची मुलगी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | बॉलीवूडमध्ये नव्वदच्या दशकात हिरो पेक्षा व्हीलनला जास्त डिमांड होती. सर्वाधिक पसंतीच्या खलनायकांमध्ये राज बब्बर हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. राज यांनी त्यांच्या काळात अनेक विरोधी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या अभिनयात एक वेगळीच जादू होती. अनेक दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी हवी असलेली रक्कम द्यायला तयार असायचे.
राज बब्बर यांची ख्याती तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. मात्र आज आपण त्यांच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत. अभिनया बरोबरच राज राजकीय वर्तुळात सक्रिय आहेत. त्यांना एक मुलगी आहे जी दिसायला कमालीची सुदंर आहे. ती देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांच्या मुलीचे नाव जुही बब्बर असे आहे.
जुहीने सोनू निगमसोबत ‘काश आप हमारे होते’ या चित्रपटातून पदार्पण केले . २००५ मध्ये तिने जिमी शेरगिलसोबत यारा नाल बहारन हा पंजाबी चित्रपट केला . या चित्रपटाने पंजाबमध्ये आणि परदेशी पंजाबी प्रेक्षकांसोबत चांगली कमाई केली. त्यानंतर जुहीने मल्याळम अभिनेता मोहनलालसोबत एक मूक चित्रपट केला. 2006 मध्ये, ती अभिनेता संजय कपूर आणि रितुपर्णा सेनगुप्ता यांच्यासोबत Unns चित्रपटात दिसली होती.
ती तिच्या पुढच्या चित्रपट इट्स माय लाइफमध्ये अभिनेता हरमन बावेजा सोबत सोनिया जयसिंगच्या भूमिकेत दिसली. जेनेलिया डिसूझा आणि नाना पाटेकर यांचा 2009 मध्ये शाहरुख खान निर्मित टीव्ही कॉमेडी घर की बात है मध्ये जुहीने गृहिणीची भूमिका केली होती. अभियनयाच्या कारकिर्दीत तिला मोठ्या पडद्यापेक्षा छोट्या पडद्यावर अधिक यश मिळाले.
जुहीचा पहिला नवरा बेजॉय नांबियार हा पटकथा लेखक होता. त्याच्याशी तिने २७ जून २००७ रोजी लग्न केले. मात्र तिचं हे नात फार काळ टिकले नाही. साल २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती टीव्ही अभिनेता अनुप सोनी यांच्या प्रेमात पडली. ते दोघेही जुहीची आई नादिरा बब्बर निर्मित नाटकात काम करत होते. त्यावेळी सोनीचे रितूशी लग्न झाले होते आणि तो दोन मुलींची पिता होता.
14 मार्च 2011 रोजी त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर जुही आणि अनुप सोनी यांनी लग्न केले. जुही आणि सोनी यांना २०१२ मध्ये एक पुत्र रत्न प्राप्त झाले. जुही दिसायला खूप सुंदर आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने आता पर्यंत सोशल मीडियावर बऱ्याचदा तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिच्या सुंदरतेमुळे ती नेहमीच चर्चेत असते.