चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! दिग्गज अभिनेते आणि निर्मात्याचं निधन

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज लोकांची प्राणज्योत मावळताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने पूर्ण जगात शोककळा पसरली होती.

 

त्यानंतर रमेश देव आणि बप्पी लहरी यांच्या निधनाने देखील मोठी शोककळा पसरली होती. यांच्या सोबत अनेक अभिनेत्यांची प्राणज्योत मावळली आहे. यांच्या दुःखातून सावरताना चाहत्यांना मोठ्या दुःखाचा सामना करावा लागत असताना.

 

आणखी एका दिग्गज निर्मात्याचं आणि अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यामुळे पूर्ण देशातील कला विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 650 पेक्षा अधिक चित्रपटांचे मिर्मितिकरण केले आहे.

 

तसेच त्यांनी काही चित्रपटांत काम देखील केलं आहे. त्यांचं नाव नारायण दास नारंग असे आहे. नारायण यांच्या निधनाने पूर्ण चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसल्याचे सांगितले जातं आहे.

 

निधनाच्या वेळी त्यांचं वय 76 वर्ष होते. तसेच त्यांचे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य दिग्गज लोकांसोबत चांगले संबंध होते. नागार्जुन, चिरंजीवी, विजय सेतुपाथी, रजनीकांत, धनुष, महेश बाबू या सारख्या दिग्गज लोकांसोबत त्यांचे जवळचे संबंध होते.

 

तसेच या दिग्गज लोकांना नारायण यांनी त्यांच्या चित्रपटात काम देखील दिले आहे. नारायण यांचा करोडो रसिकांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button