विक्रम गोखलेंच्या निधनावर नाना पाटेकर भावूक, म्हणाले… विक्रम मी…

पुणे | प्रसिध्द मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण मराठी चित्रपट सृष्टी शोककळा पसरली आहे. अनेक प्रसिध्द चित्रपटात त्यांनी भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होते. मात्र वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. तब्बल 17 दिवस रुग्णालयात दाखल राहून मृत्यू सोबत असलेली झुंज अपयशी ठरली आहे.
त्यांना पुण्यातील मंगेशकर रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधार येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली, त्यानंतर अवघ्या काही काळात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, आणि 26 नोव्हेंबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे पूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांनी अनेक दिग्गजांसोबत भूमिका साकारल्या आहेत. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांचे मैत्रीचे एक अनोखे संबंध होते. त्यांनी नटसम्राट या चित्रपटात सोबत काम केले होते. नाना पाटेकर हे त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. तर विक्रम गोखले यांनी त्या चित्रपटात सह कलाकार म्हणून काम पाहिले होते.
त्या चित्रपटात देखील ते दोघे मित्र होते. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नाना पाटेकर अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून विक्रम यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भावूक होऊन पोस्ट लिहीत नाना म्हणाले की, “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन… तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….” अशी भावूक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यासोबत त्यांनी त्या दोघांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.