नागराज मंजुळेंना झुंडमध्ये अपयश? ‘झुंड’ फ्लॉप झाल्याची चिन्हे?

पुणे | फॅन्ड्री आणि सैराट चित्रपटाच्या अफलातून यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बॉलीवूडमध्ये एंट्री मारत अमिताभ बच्चन यांना चित्रपटात घेऊन झुंड नावाचा चित्रपट प्रदर्शित केला आहे. ४ तारखेला हा चित्रपट रिलीज झाला आहे.

 

सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये प्रदर्शित झाला आहे. टीसिरीज सारखे तगडे प्लॅटफॉर्म या चित्रपटाशी सलग्न आहेत.

 

त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याची चर्चा रिलीज होण्याच्या अगोदर रंगत होती. मात्र चित्रपट रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी धक्का देणारी माहिती समोर आली आहे.

 

लाखो करोडोंच्या संख्येत चाहते या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांनी चांगल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. मात्र हा चित्रपट फ्लॉप तर ठरत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

कारण चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी समाधानकारक कमाई झालेली नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाची फक्त दीड कोटी रुपये कमाई झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी काम केलेल्या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

 

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेला आणि बिग बीने भूमिका साकारलेला चित्रपट पहिल्या दिवशी एवढी कमी कमाई करेल असे कोणालाही वाटले नसेल, पुढील दोन दिवस हा चित्रपट किती कमाई करेल याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button