नागराज मंजुळे यांचा लाडका सूरज पवार; त्याच्या या खास गोष्टी माहित आहेत का?

सोलापूर | सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा सैराट ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र ती सैराट च्या यशामुळे नाही तर त्यातील एका अभिनेत्याने केलेल्या फसवणुकीमुळे सैराट पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. सैराट चित्रपटातील सूरज पवार या सह कलाकाराने मंत्रालयात नोकरी लावतो म्हणून मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

 

नेवासा, जि – अहमदनगर येथील एका तरुणाला मंत्रालयात नोकरीला लावतो म्हणून सूरज पवार आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या कडून ५ लाख रक्कम उकळली आहे. तसेच सदर तरुणाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सूरज याच्या साथीदारांना अटक केली आहे.

 

साथीदारांनी सूरज याचे नाव देखील घेतल्याची माहिती समोर येत आहे. सूरज पवार हा नागराज मंजुळे यांचा अत्यंत लाडका कलाकार म्हणून ओळखला जातो. नागराज मंजुळे यांच्या सर्व चित्रपटात सदर सूरज हा झळकला आहे. पिस्तुल्या पासून ते अमिताभ यांच्या झुंड मध्ये देखील त्याला संधी दिली गेली आहे.

 

तो खरा प्रकाश झोतात आला तो म्हणजे सैराट चित्रपटाने त्याला प्रिन्सची भूमिका देण्यात आली होती. ही भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली यात तो खुपचं प्रकाश झोतात आला होता. सैराट पूर्वी फॅन्ड्री मध्ये देखील तो मुख्य रोल मध्ये दिसला होता. जब्याच्या मित्राची भूमिका त्याला देण्यात आली होती.

 

याच बरोबर त्याला झुंड चित्रपटात देखील छोटी भूमिका मंजुळे यांनी दिली आहे. त्यामुळे यावरून तो नागराज मंजुळे यांचा किती लाडका कलाकार आहे हे आपल्या लक्षात येईल. मात्र त्याने केलेल्या कथित गुन्ह्यांमुळे तो खूपच अडचणीत येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button