आत्ताच्या घडामोडी

नागराज मंजुळे यांच्या पत्नीवर आलेत खूपचं वाईट दिवस; पोट भागविण्यासाठी करतेय ‘हे’ काम

सोलापूर | मराठी सिनेसृष्टीत एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून अण्णा म्हणजेच नागराज मंजुळे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी या मराठी सिनेसृष्टीला अगदी थोडे पण यशस्वी आणि हिट चित्रपट दिले आहेत.

 

अशात नागराज यांनी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात सैराट हे सुवर्ण पान रचलं. या चित्रपटाने एक मोठा इतिहासच रचला. सैराट हा मराठी सिनेसृष्टीत १०० कोटींची कमाई करणारा पहिलाच चित्रपट आहे.

 

अशात नागराज मंजुळे म्हटलं की, एकदम साधा माणूस. त्यांच्या वयक्तिक जीवनाबद्दल तुम्ही आता पर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या असतील. मात्र त्यातील काही महत्वाच्या गोष्टी आज या बातमीतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

नागराज मंजुळे यांनी १७ मे १९९७ रोजी सुनीता यांच्याशी विवाह केला. फार कमी दिवस हे दोघे एकमेकांबरोबर सुखी संसार करू शकले. नागराज यांना आधीपासूनच दिग्दर्शनात रस होता. अशात तेव्हा त्यांची घरची परिस्थिती तशी गरीबच होती.

 

त्यांचं लग्न देखील अगदी साध्या पद्धतीने पार पडलं. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, अण्णा आणि त्यांच्या पत्नी शेजारी शेजारी खुर्चीवर बसले आहेत. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये ते एकमेकांना गोड पदार्थ भरवत आहेत.

 

नागराज मंजुळे हे आता आधी सारखे गरीब राहिले नाहीत. ते आता छान आणि सुखी आयुष्य जगतात. मात्र त्यांच्या या सुखी आयुष्यात त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी नाही.

 

साल २०१४ मध्ये त्यांनी सुनीता यांना घटस्फोट दिला. त्यामुळे सुनीता आता पुण्यातील सासवड परिसरात रहतात. सुरुवातीला पतीकडून मिळालेल्या पोडगितून त्या स्वतः चा उदरनिर्वाह करत होत्या. मात्र पैसे अपुरे पडत असल्याने त्यांनी धुण्या भांड्यांची कामं करायला सुरुवात केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button