निःशब्द! मित्राच्या लग्नाला गेलेले दोन तरुण परत परातलेच नाहीत; दोघांचाही झाला तरफडून मृत्यू

नाशिक | सातपूर मध्ये मित्राच्या लग्नाला गेलेले नाशिक चे दोन तरुण परतलेच नाहीत. एक युवक घटना घडलेल्या दिवशी ठार झाला तर दुसरा रुग्णालयात उपचार सुरु असताना मरण पावला. प्रकाश सुधाकर दाते आणि बादशाह परवेझ शेख असे या दुर्घटनेत बळी पडलेल्या ची नावे आहेत.

 

उत्तरप्रदेश येथील प्रतापगड या ठिकाणी सातपूर येथील हॉटेल भोलेनाथ च्या मालकाक्या मुलाचे लग्न होते. याच लग्नासाठी नाशिक मधील काही तरुण लग्नासाठी जात होते. लग्नसोहळा आटोपून ते लखनऊ येथे देवदर्शनासाठी गेले होते. या सर्व मित्रांनी हॉटेल बुक करून तेथेच मुक्काम केला होता.रात्रीच्या वेळी हॉटेल शेजारीच असलेले बिर्याणी हाऊस मध्ये प्रकाश आणि बादशहा यांनी बिर्याणी खाल्ली होती. बाकीचे पाच जण हे हॉटेलमध्ये थांबले होते.

Advertisement

 

बिर्याणी हाऊस मध्ये गॅस गळती झाली होती आणि काही वेळातच आग् लागली. या आगीमध्ये दोघेपण होरपळून निघाले. यामध्ये प्रकाश दाते हा १००% भाजला गेला तर बादशहा हा ७०% भाजला गेला. त्या दोघांना देखील लखनऊ येथे हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी घेऊन गेले.

Advertisement

 

परंतु प्रकाश हा अगोदरच मृत झाल्याचे सांगितले तर बादशहा हा उपचार चालू असतानाच मरण पावला. या घटनेने बादशहा चे कुटुंब त्याला वाचवण्यासाठी लखनऊ ल आले परंतु ते पोहोचण्यापूर्वीच तो मरण पावला. या घटनेने प्रकाश दाते आणि बादशहाच्या कुटुंबावर शोककळा पसरली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *