निःशब्द! उकळत्या पाण्यात पडून चिमुकलीचा तरफडून मृत्यू; घटना वाचून डोळ्यात पाणी येईल

औरंगाबाद | पाणी तापवण्यासाठी हिटर लावलेल्या गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण औरंगाबाद शहरातून आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद शहरातील कमलापुर येथील साईनगर मध्ये ही घटना घडली आहे.

 

श्रेया राजेश शिंदे या नावाची चार वर्षाची चिमुकली होती. ती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेल्या बादली मध्ये पडली. गरम पाण्यामुळे श्रेयाच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. तीला शासकीय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार चालू असतानाच श्रेयाचा मृत्यू झाला.

Advertisement

 

स्थानिकांच्या माहितीनुसार कमलानगर नगर येथे शिंदे कुटुंब राहत आहे. राजेश शिंदे यांना सात वर्षाचा मुलगा साई चार वर्षाची श्रेया आणि पत्नी सोबत राहत आहे. दुपारच्यावेळी राजेश कामावरून घरी आल्यावर त्यांनी अंघोळीसाठी पाणी गरम करायला हिटर लावलेला होता. राजेश यांनी आपल्या कुटुंबासोबत जेवण केले.

Advertisement

 

चिमुकली श्रेया हिने ही जेवण केले. तिने जेवण केल्यावर हात धुण्यासाठी नळाकडे गेली. शेजारीच हिटर लावेल्या बादलीत तिचा तोल जाऊन पडली. गरम पाण्यात पडल्याने ती ओरडली. तेवढ्यात धावतच राजेश आणि त्याची पत्नी बाथरूम कडे आले. परंतु राजेशला ही विजेचा धक्का बसला.

 

त्यांनी विजेची बटणे बंद केली आणि श्रेया ला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. परंतु उपचरादरम्यान श्रेया मरण पावली. आपल्या डोळ्यासमोर चिमुकलीचा जीव गेलेला पाहून राजेश आणि त्याची बायको यांनी आक्रोश करायला सुरुवात केली. चिमुकलीचा झालेला मृत्यू पाहून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *