निःशब्द! आईच्या मृतदेहाच्या कडेला बसून चिमुकली रडत होती, आईला हाक मारायची पण…

औरंगाबाद : घरातून नवरा कामावर गेला की पाठीमागे महिलेने फाशी घेतल्याची घटना घडली आहे. या वीस वर्षे महिलेने आपल्या छोट्या मुलीला घरात टीव्ही लावून दिला. मुलगी टीव्ही बघण्यात गुंग असतानाच तिने बेडरूम मध्ये जाऊन स्वतः फाशी घेतली. तिची छोटी मुलगी जेव्हा बेडरूम मध्ये गेली तेव्हा ती रडत बसली. सतत रडत असल्याने शेजारच्या बायांनी तिच्या घरात जाऊन पाहिले.तेव्हा त्यांना ही महिला फाशी घेतल्याचे दिसले. ही घटना औरंगाबाद मधील आनंद नगर या परिसरात घडली. आत्महत्या केलेले महिलेचे नाव रूपाली मयूर गायकवाड असे आहे.

 

या प्रकरणात नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेने तिच्या नवऱ्यासोबत संध्याकाळी पाच वाजता जेवण केले होते. जेवण केल्यानंतर मयूर हा कामावर निघून गेला तर सासू-सासरे हे दुकानावर निघून गेली. काही वेळाने रूपाली ने आपल्या छोट्या मुलीला हॉलमध्ये कार्टून लावून दिले. नंतर ती स्वतः खाली बेडरूम मध्ये आली आणि स्कार्फ च्या साह्याने फाशी घेतली.

Advertisement

 

बराच वेळ झाल्यानंतर ही आई वरी आली नाही. त्यामुळे आकांक्षा ही खाली बीडमध्ये आली त्यावेळी तिला आई लटकलेली दिसली. त्यामुळे चिमुरडी मुलगी जोराने रडू लागली. बऱ्याच वेळा मुलीचा आवाज ऐकल्यानंतर शेजारील बायांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी शेजारीन बायांना रूपाली ने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

Advertisement

 

या घटनेमुळे शेजारील बाया घाबरून गेले त्यांनी रूपालीच्या घरच्यांना आणि पोलिसांना कळविले. पोलीस आल्यानंतर रूपालीला फासावरून खाली उतरवण्यात आले. रूपालीने आत्महत्या केल्याचे कारण आणखी कोणाला समजले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. पोलीस आणखी तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. चिमुरडीच्या आईने आत्महत्या केल्याने परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *