निःशब्द! पत्नीला वाचविण्याच्या नादात पतीला गमवावा लागला जीव; १ महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या जोडप्याचे निधन

पुणे | जुन्नर तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. या घडलेल्या घटनेमध्ये एका नवविवाहित जोडप्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पती पत्नी या दोघांचा एकच वेळी हृदयद्रावक मृत्यू झाला. पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यात ही घटना लिहिली.
कुकडेश्वर येथे राहणारी मंजू दानवे ही महिला आपल्या घराजवळ असणाऱ्या विहिरीजवळ कपडे धूत होती. परंतु ती पाणी काढत असतानाच विहिरीत पडली. तिला विहिरीत पडलेले पाहून तिचा पती संतोष दानवे हा वाचवण्यासाठी आला. त्यानेही विहिरीत उडी मारली. परंतु पत्नीला संतोष वाचवू शकले नाहीत. या झालेल्या प्रकारात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
गेल्या १ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. संतोष दानवे आणि मंजू संतोष दानवे या दोघांचे निधन या घटनेत झाले आहे. विहिरीवर गाणी चालू असलेला मोबाईल आणि विहिरीत पाण्यावर तरंगत असलेली बादली यामुळे ही घटना उघडीस आली. अवघ्या १ महिन्यातच त्याचा संसाराचा शेवट झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.