निःशब्द! दुसऱ्या लग्नाच्या चौथ्या दिवशीच चिमुकलीसह आईची आत्महत्या; कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | काळ कधी कोणावर कसा येईल हे सांगता येणार नाही. मृत्युला काळ, वेळ आणि वयाचे बंधन नसते. अशीच एका आई सोबत घडलेली हृदय द्रावक घटना. प्रत्येक आईला आपले बाळ हे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु कधीकधी अशा काही गोष्टी घडून जातात की आपला त्यात जीव गमवावा लागतो. आणि आपल्या बाळाला या जगात आनंदाने जगता येणार नाही या विचाराने शेवटचे पाऊल देखील उचलावे लागते.

 

स्थानिक नागरिक कडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक मध्ये हसन या ठिकाणे एका महिलेने आपल्या बाळा सोबत जीव दिल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण हेच की तिच्या पहिल्या पतीला विसरून जाणे शक्य नसल्याने तिने दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या बाळा सोबत आत्महत्या केली.

Advertisement

 

प्रजवल्ला नावाच्या महिलेचा राजेंद्र नावाच्या व्यक्तीशी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नानंतर त्या दोघांना एक मुलगीही झाली होती. दोघेजण सुखात संसार करत होते. परंतु एकेदिवशी अपघातामध्ये राजेंद्र चा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्राजवल्ला अतिशय दुःखी झाली आणि तिला तिच्या मुलीच्या भविष्याची चिंता वाटू लागली. यानंतर काही दिवसांनी प्रजवल्लाच्या आयुष्यात मोहन नावाचा व्यक्ती आला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. प्रज्वलाच्या वडिलांनी तिच्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मान्यता देखील दिली. आणि त्या दोघांचा विवाह झाला.

Advertisement

 

प्रज्वल्ला तिच्या पहिल्या पतीची सतत आठवण येत होती. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. तिला असे अनेक विचार सतावत होते. त्यामुळे तिने आपले जीवन संपवण्याचा विचार केला. परंतु आपल्या मुलीला या जगात आनंदाने जगता येणार नाही हे समजून अगोदर तिने मुलीला मारले.

 

मोहन हा प्रजवलाचा दुसरा पती घरी आल्यानंतर घडलेला प्रकार समजला. दोघींनाही मृत पाहून त्यालाही धक्का बसला. त्याने प्रज्वल्लाच्या आईवडिलांना माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. दोघीचेही एकाच वेळी जाण्याने परिसरातून हळहळ व्यक होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील तपास कर्नाटक पोलीस करीत आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *