निःशब्द! आधी पतीचे निधन अन् काही वेळातच पत्नीने देखील सोडले प्राण; वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | नवऱ्याचे प्राण गेलेले समजताच बायकोने ही जीव सोडल्याची घटना मुंबई मध्ये घडली. विक्रोळी येथील कन्नमवार नगर मध्ये घडलेली मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेमुळे घरातील लोकांसोबत इतर लोकांशी धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

 

कोशी परिवार हे मुंबईतील विक्रोळी नगरात राहत होते. विनू कोशी आणि त्याची बायको प्रमिला कोशी असे मृत्यू झालेल्या जोडप्याचे नाव आहे. सकाळी लवकरच विनू कोशीची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. विक्रोळी मधील टागोर नगर मधील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले या हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. डॉक्टरांनी काही वेळानी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर पत्नी प्रमिलाला घटनेची माहिती दिली.

Advertisement

 

पतीचा मृत्यू झाल्याची बातमी मिळताच पत्नीने धसका घेतला. त्यामुळेच कोशी यांना अटॅक आला. या झटक्यात त्यांचाही मृत्यू झाला. अगोदर नवरा आणि नंतर बायको असे दोघांचेही निधन झाले. त्यामुळे काही क्षणात कोशी कुटुंब संपले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Advertisement

 

सदर घटनेनं पूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा दोघांच्या अचानक जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. नवरा गेल्यानंतर अवघ्या काही वेळातच बायकोने प्राण सोडल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *