आत्ताच्या घडामोडी

निःशब्द! एकाच चितेवर माय लेकिंचा मृतदेहाला दहन; कारण वाचून धक्काच बसेल

सोलापूर | कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. अशात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका महिनेले देखील आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. मात्र यावेळी या महिलेने स्वतःबरोबर मुलीचा देखील जीव घेतला आहे. या महिलेला दोन मुलं होती. या दोघांना देखील तिने गळफास लावला होता. मात्र यातून मुलगा सुदैवाने बचावला आहे.

 

प्रीती विजयकुमार माळगोंडे (वय २५ वर्षे) आणि आरोही विजयकुमार माळगोंडे (वय ३ वर्षे) अशी मयत मायलेकींची नाव आहेत. तसेच यात बचावलेल्या मुलगा बसवराज विजयकुमार माळगोंडे ( वय अडीच वर्षे) कोरवळी गावातील विजयकुमार माळगोंडे या युवकाबरोबर प्रीतीचा विवाह झाला होता. त्या दोघांच्या संसाराला पाच वर्षे झाली. लग्न झाल्यानंतर हे दोघे शेतातील एका घरात राहत होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले.

 

प्रीती आणि विजयकुमार या दोघांचा संसार चांगला चालला होता. त्या दोघांचे चार हात देखील झाले. प्रीती आणि विजयकुमार यांनी दोन मुलांना जन्म दिला. त्यानंतर विजयकुमारच्या वागण्यात बदल होऊ लागला. तो प्रीतीला मारहाण करू लागला. तसेच तिला शिवीगाळ देखील करत होता. प्रीतीने सुरुवातीला त्याला प्रेमाने समजावले. मात्र त्रास जास्त होत असल्याने नंतर तिने देखील भांडण करायला सुरुवात केली. ही सर्व परिस्थिती बरेच दिवस सुरू होती. याचा प्रीतीला मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता. त्यामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला.

 

घरात असलेल्या लोखंडी रॉडला तिने आपली साडी बांधली या साडीला तिने आपल्या दोन्ही मुलांना लटकवले. तसेच स्वतःला देखील फास लावून घेतला. यामध्ये मुलाचा फास्ट सैल लागला गेल्यामुळे तो यातून निसटला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र या दोघी मायलेकी या जगाचा निरोप घेऊन कायमच्या निघून गेल्या.

 

घटनेची माहिती कळतच प्रीतीच्या कुटुंबीयांनी धाव घेतली. यावेळी तिचे कुटुंबीय खूप दुःखी होते. यावेळी पोलीस देखील दाखल झाले. पोलिसांनी मायलेकीचे शव ताब्यात घेतले. तसेच पुढे शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर या मायलेकीच्या चितेला एकत्र अग्नी देण्यात आली. दोघींना देखील एकाच चितेवर ठेवण्यात आले होते. हा हृदयद्रावक प्रकार पाहून सर्व ग्रामस्थ ओक्साबोक्षी रडू लागले.

 

यावेळी मल्लिनाथ मंगरुळेने प्रीतीचा भाऊ देखील तिथे उपस्थित होता. त्याने पोलिसांकडे प्रीतीच्या पतीची तक्रार दाखल केली आहे. माझ्या बहिणीने पतीच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे विजयकुमार आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button